नांदेड जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती पाणी साठा...? वाचा सविस्तर 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 23 July 2020

तर दुसरीकडे लिंबोटी (ता. लोहा) व बारूळ (ता. कंधार) हे दोन्ही धरणे पन्नास टक्क्यापेक्षा अधीक भरले आहेत. यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील परंतु नांदेडच्या सिमेवर असलेल्या पैनगंगा नगदीवरील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) ४७ टक्के भरला आहे

नांदेड : नांदेड शहराची तहाण भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प हा जूलै महिण्यातच शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे नांदेडकरांची पाणी टंचाई मिटली आहे.  तसेच या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीलाही अच्छेदिन येणार आहेत. तर दुसरीकडे लिंबोटी (ता. लोहा) व बारूळ (ता. कंधार) हे दोन्ही धरणे पन्नास टक्क्यापेक्षा अधीक भरले आहेत. यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील परंतु नांदेडच्या सिमेवर असलेल्या पैनगंगा नगदीवरील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) ४७ टक्के भरला आहे. ही बाब नांदेडकरांसाठी समाधानकारक असून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 

नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प १०० टक्के भरला असून ता. २२ जुलै रोजी या प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता. यावर्षी जूनच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प भरले आहेत. लिंबोटी आणि बारुळ प्रकल्प ६० टक्के भरले असून ईसापुर धरणात ४७ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाला. गेल्या वर्षी गणेश चतुर्थीपर्यंत जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला होता. परंतु परतीच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरले होते. गेल्यावर्षी सुरुवातीला वार्षिक सरासरीच्या ५० टक्के झालेल्या पावसाची आकडेवारी परतीच्या प्रवासात नंतर १०० टक्के झाली.

हेही वाचा -  कोरोना : सर्वेक्षण व तपासण्या काटेकोर होणे अत्यावश्यक- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर

आतापर्यंत ५० दिवसात वार्षिक सरासरीच्या ३८ टक्के पाऊस 

यावर्षी मात्र पावसाळ्याची सुरुवात लवकर झाली. आतापर्यंत ५० दिवसात वार्षिक सरासरीच्या ३८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पात पाणीसाठा चांगला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणातून जिल्ह्यातील अर्धापूर, उमरी, भोकर, नांदेड तालुक्‍यातील शेतीसाठी पाणी सोडले जाते. तसेच २० दलघमी पाणी नांदेडची तहान भागविण्यासाठी घेतल्या जाते. ईसापुर धरणात ४९० दलघमी पाणीसाठा असून प्रकल्प क्षमतेच्या ४७ टक्के पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी प्रकल्पात ४६. ९ दलघमी म्हणजे क्षमतेच्या ६० ते ८० टक्के पाणीसाठा आहे. तर बारूळ प्रकल्पात ८३९ .९ दलघमी म्हणजे ६० देशांत ७३ टक्के पाणी आहे.

विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन महिन्यात चार वेळा गेट उघडले

विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन महिन्यात चार वेळा गेट उघडले. विष्णुपूरी शंकरसागरमध्ये अधिक पाणीसाठा झाला होता. जुलैमध्ये शंभर टक्के भरला. त्यामुळे तीन वेळा पाणी सोडावे लागले. आता चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. शंकर सागर जलाशय शंभर टक्के भरल्याने ता. २२ जुलै रोजी परभणी जिल्ह्यातील पूर्णा परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी पातळी वाढली. त्यामुळे बुधवारी (ता. २२) दुपारी बारा वाजून ४० मिनिटांनी गेट क्रमांक १४ उघडून पाणी सोडण्यात आले. ४५२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता गेट बंद करण्यात आले. त्यामुळे गोदावरी काठोकाठ भरून वाहत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How much water is stored in which dam in Nanded district Read detailed nanded news