esakal | खाकीतील माणुसकी : साडीचोळी देऊन सासरी रवानगी, कुठे ते वाचा ?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दोन वर्षांपासून किरकोळ भांडणामुळे विभक्त झालेली कुटुंब एकत्र : रामतिर्थ पोलिसांनी जोपासली सामाजिक बांधिलकी.

खाकीतील माणुसकी : साडीचोळी देऊन सासरी रवानगी, कुठे ते वाचा ?

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव (जिल्हा नांदेड) : घरगुती किरकोळ भांडणामुळे पती पत्नीत वाद निर्माण झाला. दोन लहान मुली घेऊन पत्नी दोन वर्षांपासून माहेरीच राहत होती. रविवारी (ता. 30) हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहचल्यानंतर रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी दोन्ही कुटूंबाना बोलावून गैरसमज दुर करीत समेट घडवून आणला. पोलिस ठाण्यातच साडीचोळी भेट करून यापुढे सुखाचा संसार करण्याच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांनी सामंजशाची भुमिका घेत वाद मिटविल्याने सर्व स्तरातून रामतिर्थ पोलीसांचे कौतुक होत आहे.

पोलिस ठाणे म्हटलं की आज ही ग्रामीण भागात नको रे बाबा म्हणणे प्रचलित आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढण्याबरोबर कायदा सुव्यवस्थेचा आबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची भुमिका तितकीच महत्वाची असते. पण काही काही अधिकारी, पोलिस कर्मचारी आपल्या कार्याचा वेगळेपणा लोकांच्या मनात कायम राहील अशी कामगिरी बजावून जातात. कोरोनासारख्या महामारीत देखील पोलिसांनी भुकेल्या जिवांना जेवण ,कायदा मोडणा-यांना प्रसाद, भाईगीरी करणा-यांना पोलिसगिरी तर सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिल्याचे अनेकांना अनुभवता आला आहे. काल देखील सकारात्मक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून दोन दुभंगलेल्या मनाला एकञीत आणून पोलिसातली माणूसकीचे दर्शन घडविले आहे. 

हेही वाचा -  सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा- महापालिकचे पथक कुठे आहे ? -

पती पत्नीत किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला

बिलोली तालुक्यातील चिरली येथील दुर्गा सुर्यवंशी हिचा विवाह कुंभरगाव येथील अविनाश शेळके याच्यासोबत सहा ते सात वर्षापूर्वी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. पण गत दोनवर्षापासून या पती पत्नीत किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला दुर्गाने आपल्या दोन चिमुकली मुलीसह माहेर चिरली येथे राहायला गेली होती. याबाबत पाहुणे मंडळी दोघांना ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण हा विषय मिटला नाही.रामतिर्थ पोलिसांकडे आल्यानंतर ठाणे प्रमुख सोमनाथ शिंदे यांनी सदरील प्रकरणाची माहिती जाणून घेतली व काल ( ता.३० ) रोजी रामतिर्थ पोलिस ठाण्यात दोन्ही कडील मंडळीना बोलावण्यात आले.

यांची होती उपस्थिती

यावेळी बिट जमादार पठाण, चिरली येथील सरपंच तथा पञकार अशोकराव दगडे, उपसरपंच साहेबराव कांबळे, परमेश्वर वाघमारे, कुभरगाव येथील वाघजी शेळके, मधुकर शेळके, बनकर गुरूजी, शिवराज शेळकेसह दोन्ही परीवारातील सदस्य उपस्थित होते. पती पत्नीचे हे कौटुंबिक वाद मिटवल्याने रामतिर्थ पोलिसांचे दोन्ही परीवारातील सदस्यांनी आभार मानले. 

संपादन- प्रल्हाद कांबळे