esakal | सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा- महापालिकचे पथक कुठे आहे ?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना संपल्यासारखे नागरिक गर्दी करत आहेत. मास्क व शारिरीक अंतर न बाळगणाऱ्यांविरुद्ध महापालिकेकडून सुरुवातीला दंडात्मक कारवाईसाठी विविध पथके कार्यरत होते.

सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा- महापालिकचे पथक कुठे आहे ?

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर व जिल्ह्यात मागील एक महिण्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच कोरोना बाधीतांमध्ये मृत्यूंची संख्या त्याच गतीने वाढत असतांना शहरात मात्र कोरोना संपल्यासारखे नागरिक गर्दी करत आहेत. मास्क व शारिरीक अंतर न बाळगणाऱ्यांविरुद्ध महापालिकेकडून सुरुवातीला दंडात्मक कारवाईसाठी विविध पथके कार्यरत होते. मात्र शहारातील बाजारपेठेमधील गर्दी लक्षात घेता हे पथक भुमिगत झाले की काय असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा वाढत आहे. परंतु दुसरीकडे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या बाबतीत लोक फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. प्रामुख्याने वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे तसेच मास्कचा वापर करणे या नियमांचा बोजवारा उडाला आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. मध्यंतरी सुरू झालेली कारवाई देखील आता थंडावली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखीनच वाढला आहे.

हेही वाचा -  भारुडातून सामाजिक परिवर्तनाचा जागर करणारी तिसरी पिढी -

गंभीर आजारवाल्यांना जास्त धोका

गेल्या काही दिवसापासून नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कित्येक पटीने वाढत आहे. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुळे बाधित होत आहेत. हे रुग्ण ठेवण्यासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालये कमी पडत असल्याचे चित्र आहे. अनेक जण तर पॉझिटिव झाल्यानंतरही प्रशासनाची परवानगी घेऊन घरीच औषधोपचार घेत आहेत. ज्या रुग्णांना दमा, अस्थमा, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आजार आहेत अशा रुग्णांना कोरोनाची लागण झाली तर त्यांच्यासाठी अधिक धोका आहे. विशेषतः वयस्क व्यक्तींसाठी धोकादायक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळणे, मास्क वापर करणे या प्रमुख गोष्टींचे नियम पाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. तरीसुद्धा अनेक जण या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येते.

खुलेआम तोंडावर मास्क न लावता फिरत असतात

रस्त्यावर फिरताना काहीजण खुलेआम तोंडावर मास्क न लावता फिरत असतात. तसेच गर्दीच्या ठिकाणी देखील सोशल डिस्टंसिंग नियम पाळत नाहीत. प्रामुख्याने शहरातील बाजारपेठेमध्ये या नियमांचे कुठेही पालन होत नसल्याचे पहावयास मिळते. अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असते अशा वेळी स्वतः व्यापारी तसेच त्यांचे कर्मचारी यापैकी कोणताही नियम पाळत नाहीत. तसेच ग्राहकांना यासाठी आग्रहसुद्धा करीत नाहीत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने पथके तयार केली आहेत. बाजारपेठांमध्ये फिरून नियम डावलणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना या पथकाला देण्यात आली आहे.

येथे क्लिक कराकिनवटजवळ झालेल्या दुचाकींच्या अपघातात चार ठार

महापालिकेने पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईला वेग द्यावा

सुरुवातीच्या काळात या पथकाने व्यापाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई देखील केली. परंतु आता ही मोहीम बऱ्याच प्रमाणात थंडावलेली दिसून येते. व्यापारी तसेच छोटे व्यावसायिक प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवित असतानाही प्रशासन त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे व्यापारी सर्रास गर्दी करत आहेत. गल्लीबोळातील दुकाने तर रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. या व्यापाऱ्यांविरुद्ध महापालिकेने पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईला वेग द्यावा जेणेकरुन कोरोनाला प्रतिबंध घालता येणार आहे.