esakal | खाकीतील माणुसकी : आदिवासी पाड्यावरील आदीमाना मायेची ऊब
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

किनवटपासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिवराम खेडा या आदिवासी वस्तीतील चौदा कोलाम आदिवासी जमातीची कुटुंबे तेथून दोन किलोमीटर अंतरावर डोंगर पायथ्याच्या कपारीत बांबूच्या तट्यांच्या भिंती करुन त्यावर पत्र्याचा आधार देऊन बनवलेल्या झोपड्यात वास्तव्य करतात.

खाकीतील माणुसकी : आदिवासी पाड्यावरील आदीमाना मायेची ऊब

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : किनवट तालुक्यातील डोंगराच्या पायथ्यावर बांबूच्या तट्यांचा आडोसा बनवून राहणाऱ्या कोलम जमातीच्या कुटुंबीयांना दिवाळी फराळ व ब्लॅंकेटची भेट देऊन किनवट पोलिसांनी खाकीतील मायेचा झरा वाहता केला. किनवटपासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिवराम खेडा या आदिवासी वस्तीतील चौदा कोलाम आदिवासी जमातीची कुटुंबे तेथून दोन किलोमीटर अंतरावर डोंगर पायथ्याच्या कपारीत बांबूच्या तट्यांच्या भिंती करुन त्यावर पत्र्याचा आधार देऊन बनवलेल्या झोपड्यात वास्तव्य करतात.

या ठिकाणी जायला रस्ता नाही. गावात रात्री वीज नसतानाही अशा अवस्थेत वन उपज व लगतच्या वनजमिनीवर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासोबत या वर्षीची दिवाळी साजरी करायची असे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या लक्षात आले. त्यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कंत्राटदार नेम्मानीवार यांनी प्रत्येक कुटुंबाकरिता ब्लँकेट आणि पोलिस ठाणे किनवटच्या वतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती थोरात यांनी प्रत्येक कुटुंबासाठी फराळाची व्यवस्था केली.

हेही वाचा - नांदेड : अर्धापुरात मनोरूग्ण मित्राचा मित्रांनी केला धुमधडाक्यात वाढदिवस साजरा, जिल्ह्यात ठरला चर्चेचा विषय

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाड्यात राहतात

अंबाडी तांडा नंतर रेल्वेमार्गपर्यंत गाडी जाते. लोहमार्ग ओलांडून शिवराम खेडा येथील पारंपरिक मोरपिसांचा टोप घातलेल्या नृत्य संघाने या सर्वांचे स्वागत करुन वाजत-गाजत गावाबाहेरच्या वाटेपर्यंत सोडले. त्यानंतर पुन्हा लोहमार्ग पाय वाटेने जाऊन रुळ ओलांडून जंगल वाटेने दीड किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर कोलाम जमातीचे काही कुटुंब येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाड्यात राहतात. ग्रामपंचायत एकूणच हायमास्कचा लाईटचा फोन उभारला नाही. परंतु रात्री अंधारात एकेकाळी नक्षलवादी विजयकुमार येथे यायचा असे लक्ष्मीबाई सांगत होत्या.

दिवाळीच्या दिवशी मात्र त्यांच्या वस्तीत चक्क पोलिस 

परंतु या वर्षी दिवाळीच्या दिवशी मात्र त्यांच्या वस्तीत चक्क पोलिस आले. त्यांनी सर्वांशी संवाद साधून आपल्या अडीअडचणी धाडसाने पोलिसांना भाऊ म्हणून कळवाव्यात ही विनंती केली. एवढएच नाही तर त्यांच्यासाठी दिवाळीचा फराळ व थंडीपासून बचावासाठी उबदार आणि दर्जेदार ब्लॅंकेट दिले. यावेळी मंदार नाईक, अजय नेम्मानीवार, मारुती थोरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंबाडी तांडाचे सरपंच प्रेमसिंग जाधव, नागोराव आत्राम, गुलाब मडावी, लक्ष्मण कोलाम आणि रामा टेकाम यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

loading image