

Two Good Samaritans Rush Unconscious Woman to Hospital on Parbhani Manwat Road Inspiring Humanity and Compassion
esakal
-प्रसाद शिवाजी जोशी
मानवत: एक वीस-पंचवीस वयोगटातील युवती रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तोंडाला स्कार्फ व टॉप एवढेच अंगावर होते. नेहमीप्रमाणे वर्दळ चालू होती. शेकडो वाहने येत जात होती. परंतु कोणीही मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. अखेर परभणी मधील दोन युवक माजलगावकडे निघाले होते. हे दृश्य पाहून त्यांचे मन हेलावले आणि त्यांनी युवतीस रुग्णालयापर्यंत पोहोचवले.