नांदेडला चोरट्याने केलेल्या पर्स चोरीमुळे पती, पत्नी पडले दुचाकीवरून

अभय कुळकजाईकर
Tuesday, 10 November 2020

सांगवीतील दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावरून गिरीजाजी कपाटे आणि त्यांची पत्नी यशोदा कपाटे (रा. कृष्णानगर, कॅनाल रोड, डी मार्टजवळ) हे दोघेजण दुचाकीवरून (एमएच २६ - एई १९१७) जात होते. त्यावेळी त्यांचा दोघांनी दुचाकीवरून पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्या खांद्यावर असलेली पर्स जबरीने हिसकावून घेऊन पळून गेले. या झटापटीत पती पत्नी दोघेही दुचाकीवरून पडले. त्यात यशोदा कपाटे यांना डोक्याला व छातीला मार लागला. तसेच पतीलाही हातापायाला मार लागला.

नांदेड - दुचाकीवरून जाणाऱ्याची पर्स चोरण्याच्या प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यात झालेल्या अपघातात पती - पत्नी गंभीर जखमी झाले. सदरील घटना नांदेड रेल्वे कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर रविवारी (ता. आठ) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगवीतील दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावरून गिरीजाजी कपाटे आणि त्यांची पत्नी यशोदा कपाटे (रा. कृष्णानगर, कॅनाल रोड, डी मार्टजवळ) हे दोघेजण दुचाकीवरून (एमएच २६ - एई १९१७) जात होते. त्यावेळी त्यांचा दोघांनी दुचाकीवरून पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्या खांद्यावर असलेली पर्स जबरीने हिसकावून घेऊन पळून गेले. या झटापटीत पती पत्नी दोघेही दुचाकीवरून पडले. त्यात यशोदा कपाटे यांना डोक्याला व छातीला मार लागला. तसेच पतीलाही हातापायाला मार लागला. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव करत आहेत. 

हेही वाचा - नांदेड : कापूस उत्पादक शेतकरी ऐन दिवाळीमध्ये अडचणीत
 

मुदखेडला ५४ हजारांची चोरी
नांदेड - मुदखेड शहरातील कुंभार गल्लीतील प्रतिभा चंद्रकांत तेलंगे (वय ३२) या घराला कुलुप लाऊन माहेरी नांदेडला आल्या होत्या. सोमवारी (ता. नऊ) चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून सोन्याचांदीचे ५४ हजाराचे दागिने चोरून नेले. याबाबत मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक मुंडे करत आहेत. 

सिंधी तांड्यात ४५ हजारांची चोरी
नांदेड - सिंधी तांडा (ता. उमरी) येथील शेतकरी पुराजी जगना चव्हाण हे घराला कुलुप लाऊन शेतात काम करण्यासाठी गेले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजे कुलुप तोडून आत प्रवेश केला. लोखंडी पेटीतील ४५ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक सरोदे करत आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड ः कंधारची ‘एसबीआय’ बनली दलालांचा अड्डा 

सोमेश कॉलनीत दोन मोबाईल चोरले
नांदेड - वजिराबाद भागातील सोमेश कॉलनीत श्यामसुंदर सत्यनारायण लाहोटी (वय १९) हे व्यापारी घराचे दार उघडे ठेऊन बाथरूममध्ये गेले. त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करून स्टूलावर ठेवलेला ५० हजाराचा एक आणि दोन हजार रुपयांचा एक असे दोन मोबाईल चोरून नेले. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार आडे करत आहेत. 

ॲटोरिक्षाची चोरी
नांदेड - देगलूर नाका भागातील आयेशा फंक्शन हॉल जवळील सिटीझन बेकरी येथे फारूख बेग (रा. फत्तेबुरूज, इतवारा) यांनी त्यांचा ॲटोरिक्षा (एमएच २६ एन ३३७७) सायंकाळी सहा वाजता उभा केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांचा ॲटोरिक्षा चोरून नेला. याबाबत इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार वाकडे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband and wife fell off a bike after stealing a purse in Nanded, Nanded news