‘या’ प्रवासात पती- पत्नीला करावी लागत आहे कसरत, कोणत्या ते वाचा ?

प्रल्हाद कांबळे
Friday, 7 August 2020

पती- पत्नी जर प्रवास करत असतील तर त्यांनाही एका आसनावर बसून प्रवास करता येत नाही. असे जर झाले तर त्याला चालक व वाहक यांना जबाबदार धरुन त्यांना विचारणा केली जाणार असल्याने वाहक व चालकांमध्ये नाराजीचा सुर पसरला आहे. 

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हा अंतर्गत एसटी महामंडळाच्या बसना प्रवाशी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली. मात्र परवानगी देताना काही अटी व शर्ती लादून दिल्या. त्यात एसटी बसमध्ये वाहक व चालक सोडून अन्य २२ प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे पती- पत्नी जर प्रवास करत असतील तर त्यांनाही एका आसनावर बसून प्रवास करता येत नाही. असे जर झाले तर त्याला चालक व वाहक यांना जबाबदार धरुन त्यांना विचारणा केली जाणार असल्याने वाहक व चालकांमध्ये नाराजीचा सुर पसरला आहे. 

जिल्ह्यात अंतर्गत एसटी बस सेवा सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही चांगलीच कसरत करावी लागत आहे. बसमध्ये अतिरिक्त व्यक्ती दिसल्यास ज्या प्रवासाला एखाद्या स्टॉपवरून घेतले नाही तर तो बसचा पाठलाग करुन बससमोर येऊन बसमधील प्रवाशांचा फोटो काढून वरिष्ठांकडे पाठवित आहेत. एवढेच नाही तर पती- पत्नी एकत्र बसलेले किंवा महामंडळाचे कर्मचारी अतिरिक्त असल्याचे पाहून अनेक वेळा वाहकाशी प्रवाशी वाद घालत आहेत. यामुळे चालक व वाहकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असून त्यांच्यात नाराजी पसरली आहे. 

हेही वाचा नांदेड : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागन

एसटी प्रवास सुखकर व सुरक्षीत समजला जातो

एसटी प्रवास सुखकर व सुरक्षीत समजला जातो. लालपरीतून प्रवास करणे हे कधीही चांगले असते. त्यामुळे आजही एसटी बसची नाळ समाजातील प्रत्येक नागरिक व प्रवाशांशी जोडलेली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आता बसमधून प्रवास करनेही अवघड झाले आहे.  एखाद्या पती- पत्नीला जर प्रवास करायचा असेल तर त्यांच्यावरही अनेकांची नजर राहणारा आहे. कारण पती- पत्नीला वेगवेगळ्या आसनावर बसुन प्रवास करावा लागत आहे. असे जर जोडपे एका आसनावर दिसले तर त्याला जबाबदार वाहकाला धरण्यात येणार असल्याने त्याची विशेष काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. 

येथे क्लिक करा महिलांनो सावधान : मोबाईल दुरुस्तीसाठी देत असाल, तर अशी घ्या काळजी...

शहर वहतुक करणारी बससेवा सुरु करावी

‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीद वाक्याला घेऊन एसटी महामंडळाची बस (लालपरी) ही मागील अनेक दशकांपासून प्रवाशांच्या सेवेत आहे. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परिवहन महामंडळाने बसची सेवा काही दिवस रद्द केली होती. दरम्यान प्रवाशांची मागणी व काही इतरत्र ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची गरज लक्षात घेता एसटी महामंडळाने बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र बसमध्ये फक्त २२ प्रवाशानांच प्रवास करण्याची सवलत दिली. अशा अटी लादून बस सेवा फक्त जिल्हा अंतर्गतच सुरु केली. शेजारील जिल्ह्यातसुद्धा तिला प्रवास करता येणार नाही. अगोदरच तोट्यात असलेल्या या महामंडळाला पुन्हा मोठा आर्थीक फटका बसत आहे. विशेष म्हणजे नांदेड शहरातील शहर वाहतूक अजूनही बंदच असल्याने शहरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. शहर वहतुक करणारी बससेवा सुरु करावी अशी मागणी पुढे येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband and wife have to exercise in this journey, read which one nanded news