धक्कादायक : ‘झिंगाट’ पतीकडून पत्नी व मुलाचा गळा चिरून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

download (2).jpg


तानाजी भुताळे (वय ३२) हा येडूर (ता. देगलूर) येथील रहिवाशी असून मंडलापुर (ता.मुखेड) ही त्याची सासरवाडी आहे. पत्नी माहेरी असल्याने सासरवाडीला आलेल्या पतीने तिला साेबत येण्याबाबत तगादा लावला हाेता. त्यातच लाॅकडाऊनमुळे आर्थिक अडचण असल्याने दाेघामध्ये वादावादी झाली हाेती. या मुळे पत्नी येडूर येथे जाण्यास नकार देत हाेती. या मुळे तानाजीने दारू पिऊन बुधवारी सकाळी पुन्हा वाद घालण्यास सुरवात केली. 

धक्कादायक : ‘झिंगाट’ पतीकडून पत्नी व मुलाचा गळा चिरून खून


मुखेड, (जि. नांदेड) ः दारू पिऊन झिंगाट झालेल्या एका युवकाने रागाच्या भरात पत्नी व चाैदा महिन्याच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची घटना बुधवारी (ता.२७) सकाळी दहाच्या सुमारास मंडलापुर (ता.मुखेड) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - धक्कादायक : जिल्हा शासकीय रुग्णालयच सील करण्याची वेळ येण्याची शक्यता


याबाबत माहिती अशी की, तानाजी भुताळे (वय ३२) हा येडूर (ता. देगलूर) येथील रहिवाशी असून मंडलापुर (ता.मुखेड) ही त्याची सासरवाडी आहे. पत्नी माहेरी असल्याने सासरवाडीला आलेल्या पतीने तिला साेबत येण्याबाबत तगादा लावला हाेता. त्यातच लाॅकडाऊनमुळे आर्थिक अडचण असल्याने दाेघामध्ये वादावादी झाली हाेती. या मुळे पत्नी येडूर येथे जाण्यास नकार देत हाेती. या मुळे तानाजीने दारू पिऊन बुधवारी सकाळी पुन्हा वाद घालण्यास सुरवात केली. 

चिमुकल्याच्या हत्येमुळे सर्वत्र हळहळ
दरम्यान रागाच्या भरात त्याने जवळच असलेल्या तीक्ष्ण हत्याराने पत्नी व चाैदा महिन्याच्या मुलाचा गळा चिरून खून केला. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी ही बाब पाेलिसांना कळविली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पाेलिस निरीक्षक एन.जी.आकुसकर, सहाय्यक पाेलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केला असता सदरील प्रकार उघडकीस आला. चाैकशी करून संबंधित आराेपीस ताब्यात घेतले असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले. नक्की काेणत्या कारणासाठी खून करण्यात आला याबाबतची चाैकशी करण्यात येत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. सव्वा वर्षाचा मुलाचा खून झाल्याचे गावकऱ्यांना समजताच गावात एकच खळबळ उडाली हाेती. तर चिमुकल्याच्या हत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात हाेती.  


दुसऱ्या घटनेत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती असी की, आटकळी (ता. बिलोली ) गावालगतच घर बांधून असलेल्या मारुती रघुपती याला दारूचे व्यसन होते. दारुसाठी घरातील सर्व सदस्यांना तो नेहमी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. मंगळवारी (ता. २६) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मारुती रघुपती हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. दारू पिल्यानंतर घरी त्याने मुलाशी व पत्नीशी वाद घातला. यावेळी मारुती रघुपती यांची बहीणही त्या ठिकाणी होती. आत्याच्या देखतच बाप अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याने मारूती रघुपतीचा मुलगा भुजाजी (वय २०) याचा राग अनावर झाला. भुजाजीने धारदार चाकूने मारुतीला भोसकले तसेच गळा चिरून खून केला.

टॅग्स :Mukhed