नांदेड : पत्नीला ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप; प्नमुख जिल्हा न्यायाधीशांचा निकाल

file photo
file photo
Updated on

नांदेड : आईची शेती पत्नीच्या नावे केल्याच्या कारणावरुन पत्नीला तल्हारी (ता. किनवट) शिवारात गाठून तिच्या डोक्यात फावड्याने जबर मारुन ठार करणाऱ्या पतीस पाच हजार रुपये दंड व जन्मठेपेची शिक्षा शुक्रवार (ता. १२)  प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी सुनावली. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, किनवट तालुक्यातील सेवादास तांडा तल्हारी येथील चंद्रकलाबाई सवाईराम राठोड हिचे लग्न जलधारा तांडा येथील नरेंद्र परसराम पवार याच्यासमवेत झाले होते. लग्नानंतर ती नवर्‍यासोबत नांदण्यासाठी जलधारा येथे गेली होती. दरम्यानच्या काळात या दमप्त्याना दोन अपत्येही झाली. 

हेही वाचा - Success Story : सवना येथे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड, युवा शेतकऱ्याचा यशस्वी उपक्रम

लग्नानंतर काही दिवसांनी नरेंद्र पवार वेगवेगळ्या कारणाने पत्नी चंद्रकलाबाईस शारीरिक व मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून ती काही दिवस माहेरी आली होती. हा वाद आपसात मिटावा या उद्देशाने ता. दोन जून २०१५ रोजी गावातील प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत समेटाची बैठक झाली. ज्यात चंद्रकलाबाईस हिच्या सासूच्या नावे असलेल्या शेतापैकी काही जमीन चंद्रकलाबाईच्या नावे करण्याचे ठरले. त्यानुसार ता. दोन जून २०१५ संमती वाटणीपत्रकाद्वारे सदर जमीन चंद्रकलाबाईच्या नावे करण्यात आली. 

आईची जमीन बायकोच्या नावे केल्याचा राग मनात ठेवून आरोपी नरेंद्र परसराम पवार हा ता. सहा जुलै २०१५ रोजी सेवादास तांडा ( तल्हारी ) येथे आला. चंद्रकलाबाई ही मुलगी पूजा हिस दवाखान्याला घेऊन जात असताना तिचा जिवे मारण्याच्या उद्देशाने हातात फावडा घेऊन पाठलाग केला. जिव वाचविण्यासाठी चंद्रकलाबाई ही कैलास राठोड याच्या शेतात पळाली असता तिचा पाठलाग करुन तिला जमीनीवर पाडून डोक्यावर फावड्याने प्रहार करून तिला ठार केले.

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्याला तब्बल 566 कोटींचा अतिवृष्टी निधी मंजूर
 
या प्रकरणी मयत चंद्रकलाबाईचे वडील सवाईराम यांच्या फिर्यादीवरुन इस्लापूर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांनी केला. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी या प्रकरणातील फिर्यादी सवाईराम व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बंडू राठोड, कैलास राठोड, बालाराम राठोड आणि तज्ज्ञ डॉ. के. एस. मुंडे व इतर असे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकील आशिष गोधमगावकर यांनी केलेल्या युक्तीवाद व त्यास आरोपीतांकडून आलेल्या उत्तरावरून प्रमख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी आरोपी नरेंद्र परसराम पवार यास जन्मठेप व पाच हजार रुपये  दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारची बाजू जिल्हा सरकारी वकील आशिष गोधमगावकर यांनी मांडली. या प्रकरणात न्यायालयीन कामकाजात इस्लापूर पोलिस ठाण्याचे पैरवीकार अमलदार श्री. मेडपलवार यांनी मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com