नांदेड : मी वृक्षमित्र स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके

प्रल्हाद कांबळे
Saturday, 12 September 2020

मी वृक्षमित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इयत्ता 5 ते 10 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित वृक्षलागवड स्पर्धा निःशुल्क असून ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून त्यांना जमेल त्या जागेवर एका वृक्षाची लागवड करून वर्षभर जोपासना करावयाची आहे.

नांदेड - वृक्षमित्र फाऊंडेशनच्या वतीने नांदेड जिल्ह्यात वृक्षलागवड व संगोपनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरण संरक्षण, वनक्षेत्र वाढ सोबतच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी मी वृक्षमित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इयत्ता 5 ते 10 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित वृक्षलागवड स्पर्धा निःशुल्क असून ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून त्यांना जमेल त्या जागेवर एका वृक्षाची लागवड करून वर्षभर जोपासना करावयाची आहे.

वृक्षमित्र फाऊंडेशन तर्फे विजेत्यांना पुढील वर्षी वर्षभराचा आढावा गुणांकनासाठी गृहीत धरून अनुक्रमे प्रथम 5000/-, द्वितीय 3000/-, तृतीय 2000/- रोख पारितोषिकासोबतच सत्कार, मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे व उत्कृष्ट वृक्ष संगोपनासाठी 11 जणांचा विशेष सत्कार व रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील ६२ केंद्रांवर रविवारी ‘नीट’ची परीक्षा, दोन परीक्षा केंद्रात बदल, जेईई मेन्सच्या गोंधळाची पुनरावृत्ती टळणार का? -

11 विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वृक्ष संगोपनासाठी पारितोषिके

आता या स्पर्धेत भाग घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी सुरेशराव अंबूलगेकर यांनी विशेष पारितोषके जाहीर केली आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृतीची जाण विकसित होण्यासाठी हा उपक्रम पूरक ठरणार आहे. या स्पर्धेत गुणांनुसार तीन यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्यातर्फे वैयक्तिक स्वरूपात रोख 5000, 3000, 2000 व मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच इतर 11 विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वृक्ष संगोपनासाठी पारितोषिके पुढील वर्षी देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सामील होण्याचा शेवटचा दि. 17 सप्टेंबर

इयत्ता 5 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला जमेल त्या सुरक्षित ठिकाणी एका झाडाची लागवड करून झाडासह फोटो जी.पी.एस. ऍपद्वारे काढलेला फोटो व्हाट्‌सअप नंबर 9890136510 यावर पाठवावा. वरील नंबरवर ऑनलाइन फॉर्मची लिंक साठीही संपर्क करावा. स्पर्धेत सामील होण्याचा शेवटचा दि. 17 सप्टेंबर 2020 मराठवाडा मुक्ती संग्रामदिन आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड तर्फे करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I prize the winners of the tree friends competition nanded news