नांदेड जिल्ह्यातील ६२ केंद्रांवर रविवारी ‘नीट’ची परीक्षा, दोन परीक्षा केंद्रात बदल, जेईई मेन्सच्या गोंधळाची पुनरावृत्ती टळणार का? 

शिवचरण वावळे
Saturday, 12 September 2020

जिल्ह्यात रविवारी एकूण ६२ परीक्षा केंद्रांवर राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (यूजी) नीटची परीक्षा होणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने १५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ऐनवेळी शहरातील सोमेश कॉलनी येथील नेहरू इंग्लिश स्कूल व बाबासाहेब देशमुख गोरठेकर आर्ट, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय या दोन परीक्षा केंद्रांत बदल केल्याने पालकांमध्ये आतापासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नांदेड - जेईई मेन्स परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी वाहनांअभावी चांगलीच कसरत करावी लागली होती. ऐनवेळी नीट परीक्षेच्या दोन केंद्रांत बदल करण्यात आल्याने रविवारी (ता.१३) होणाऱ्या नीट परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात रविवारी एकूण ६२ परीक्षा केंद्रांवर राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (यूजी) नीटची परीक्षा होणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने १५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ऐनवेळी शहरातील सोमेश कॉलनी येथील नेहरू इंग्लिश स्कूल व बाबासाहेब देशमुख गोरठेकर आर्ट, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय या दोन परीक्षा केंद्रांत बदल केल्याने पालकांमध्ये आतापासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रात बदल झाला आहे अशा विद्यार्थ्यांना यूजीकडून एसएमएस व मेलद्वारे माहिती कळविण्यात आली असून, अशा विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून नवीन ॲडमिट कार्ड डाउनलोड करणे आवश्‍यक आहे. 

हेही वाचा- आरेच्च नांदेडात पुरुष नसबंदीचा आकडा शोधून सापडेना, महिलांनाच घ्यावा लागतो नसबंदीसाठीही पुढाकार ​

करिअर मार्गदर्शक केंद्रांच्या नावाखाली देखावा 

विशेष म्हणजे नीट परीक्षेची सर्व अधिकृत माहिती औरंगाबाद येथून दिली जात असल्याने नीट परीक्षेला किती विद्यार्थी बसले आहेत, याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शहरातील काही करिअर मार्गदर्शक केंद्रांच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा देखावा केला जात असला तरी, त्यांच्याकडे देखील नीट परीक्षेबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी व पालकांची धावपळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

हेही वाचा- सोनेतारणावर फायनान्स कंपनीकडून ९० टक्के कर्ज नाही ​

यंदा १७२ परीक्षा केंद्रात वाढ 

नेहरू इंग्लिश स्कूल (सोमेश कॉलनी) या सेंटरऐवजी केंद्रीय विद्यालय (विमानतळ रोड, नांदेड) व बाबासाहेब देशमुख गोरठेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमरी या परीक्षा केंद्राऐवजी प्रभावतीनगर परभणी येथील अरबिंदो अक्षर ज्योती असे परीक्षा केंद्र निश्‍चित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी देशभरातील ४४३ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा नीटच्या परीक्षा केंद्रात १७२ अशी वाढ करण्यात आली आहे. 

आयआयबी विद्यार्थी- पालकांची राहण्याची सुविधा

 परीक्षेला आलेल्या परजिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार नाही. यासाठी आयआयबी मार्फत राहण्याची व जेवण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यापूर्वी परजिल्ह्यातील परिक्षार्थीने फोन करुन त्याची पूर्व कल्पना द्यावी लागणार आहे. एका विद्यार्थ्यांसोबत एकाच व्यक्तीने यावे असे आवाहन देखील आयाआयबीकडून करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the examination of 'Neat' on Sunday at 62 centers in Nanded district, change in two examination centers, avoid recurrence of confusion of JEE Mains Nanded News