esakal | नांदेडला रस्त्याने मोकाट फिराल तर जागेवरच कोरोना तपासणीसह दंड - जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड शहरातील नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे टाळून स्वत: व  आपल्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा होणार नाही यांची काळजी घ्यावी, जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

नांदेडला रस्त्याने मोकाट फिराल तर जागेवरच कोरोना तपासणीसह दंड - जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व्यापाऱ्याच्या कोविड चाचणीवर भर दिल्यानंतर आता विविध भागात मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशिर कारवाईसाठी सहा पथके नियुक्त करण्यात आले आहेत. दोषीविरुध्द जागेवरच आर्थिक दंड आकारण्यासाठी हे पथक मंगळवारपासून (ता. १३) नांदेड शहरात कार्यरत होणार आहे. अशा व्यक्तींमध्ये कुणाबद्दल जर शंका आली तर त्या व्यक्तींची तत्काळ कोरोना चाचणी करुन त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये रवाना केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. 

भारतीय दंड संहिता १८६०, साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार यापूर्वी काढलेल्या आदेशानुसार कारवाई केली जाईल. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे टाळून स्वत: व  आपल्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा होणार नाही यांची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी आवाहन डॉ. विपीन इटनकर यांनी केले. कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक पथकात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा - प्रत्येक कोरोना बाधितांना रेमडेसिवीरची आवश्यकता नाही- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

एक हजार ७९८ व्यक्ती कोरोनाबाधित
नांदेड जिल्ह्यात सोमवारी (ता. १२) प्राप्त झालेल्या पाच हजार ९६७ अहवालापैकी एक हजार ७९८ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे एक हजार ४१ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७५७ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ५९ हजार ४०८ एवढी झाली असून यातील ४५ हजार १९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १२ हजार ८५९ रुग्ण उपचार घेत असून १८८ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जागरुक नागरिकांनी योगदान द्यावे
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

१२ हजार ८५९ बाधितांवर औषधोपचार सुरु 
ता. आठ ते ता. ११ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या एक हजार १०३ एवढी झाली आहे. आज सोमवारी एक हजार २९४ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात १२ हजार ८५९ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.६ टक्के आहे. सोमवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे पाच, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे दोन तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे दहा खाटा उपलब्ध आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोलीत सर्व बाजारपेठ सुरु, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचा पुढाकार

नांदेड कोरोना मीटर

  • एकुण स्वॅब- ३ लाख ८० हजार ५५८
  • एकुण निगेटिव्ह - ३ लाख १३ हजार ६८४
  • एकुण पॉझिटिव्ह - ५९ हजार ४०८
  • एकूण बरे - ४५ हजार १९१
  • एकुण मृत्यू - एक हजार १०३
  • आज प्रलंबित स्वॅब - ३९७
  • उपचार सुरू -१२ हजार ८५९
  • अतिगंभीर - १८८