नांदेड - प्रवेश घ्यायचा असेलतर विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी घ्या, महाविद्यालयांची शक्कल

शिवचरण वावळे
Friday, 28 August 2020

कोरोनाचा प्रादूर्भाव आणि लॉकडाउनमुळे शिक्षण क्षेत्राचे तिनतेरा वाजले आहेत. कोरोनाने अनेक पालकांच्या हातचे काम अन नोकऱ्या देखील सोडाव्या लागल्या आहेत. अशात पाल्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचा बोजा उचलायचा कसा? असा प्रश्‍न पालकांना पडला आहे.  

नांदेड ः कोरोनामुळे सर्वच क्षेत्र कमी अधिक प्रमाणात विस्कळीत झाले आहे. त्यास शिक्षणक्षेत्र देखील अपवाद राहिले नाही. त्यामुळे यंदा प्रवेश आणि परिक्षा शुल्कामध्ये सवलत दिली जावी, अशी पालकांची व विविध शिक्षण संघटनेकडून मागणी होत आहे. शिक्षण संस्थांनी देखील नवीन शक्कल लढवत प्रवेश शुल्कात सवलत दिल्याचे दाखवत अनुदानीत अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झाल्याचे सांगुन विना अनुदानीत अभ्यास क्रमास प्रवेश घ्यावा लागेल, अशी अट घालताना दिसत आहे.     

सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश हे आॅनलाईन सुरु आहेत. अनुदानित अभ्यासक्रमासाठी ७०० ते ८०० रुपयात प्रवेश मिळतो. तर विना अनुदानित अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आठ ते १० हजार रुपये मोजावे लागतात. मात्र मोठ्या प्रमाणावर शुल्क वसुल करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनुदानित अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश फुल्ल झाले आहेत. प्रवेश घ्यावयाचाच असेलतर, विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी घ्यावा, असे सांगितले जात आहे. 

हेही वाचा- नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी- पालकमंत्री अशोक चव्हाण ​

विना अनुदानित अभ्यासक्रम प्रवेश फीस मध्ये सवलत

त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना नाईलाजाने जास्तीचे शुल्क भरून विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा लागत आहे. परिणामी पालकांना आर्थिक फटका बसत आहे. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनाने अधिकचे शुल्क वसुल करण्यासाठी नामी शक्कल लढवली. प्रवेश शुल्कात जुजबी कपात व प्रवेश शुल्क भरण्यासाठी दोन ते तीन हप्त्यांची सवलत दिली जात असल्याचा दयाळुपणा दाखवला जात असल्याचा प्रकार सर्रासपणे होत आहे.   

हेही वाचा- चौदा वर्षानंतर जिल्ह्यातून चिकनगुनिया हद्दपार! आरोग्य यंत्रणेचा अहवाल; रुग्णांचे प्रमाण झाले कमी ​

प्रवेशावरुन विद्यार्थी नाराज

दहावी - बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज केले आहेत. आॅनलाईन प्रवेश अर्जाची मुळ प्रत प्रवेशापूर्वी फीस भरुन ती प्रत महाविद्यालयात जमा करणे बंधनकारक असते. प्रवेश निश्‍चित झाल्याने आनंदाच्या भरात परिक्षा शुल्क भरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मात्र वेगळाच अनुभव येत आहे. महाविद्यालयाच्या या मनमानी कारभाराकडे कुणाचेही लक्ष राहिलेले नाही. त्यामुळे चांगले गुण घेऊन देखील नामांकित महाविद्यालयात मनासारख्या शाखेला प्रवेश मिळत नसल्याचे काही विद्यार्थी व पालकांनी सांगितले. यामुळे विद्यार्थी दुखावले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If You Want To Get Admission In Nanded Take It For Unsubsidized Courses Nanded News