नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी- पालकमंत्री अशोक चव्हाण

file photo
file photo

नांदेड : कोविड-19 मुळे जगभरात आव्हान निर्माण झाले असून यात सर्व क्षेत्र ढवळून निघाले आहे. भारतात शैक्षणिक परिक्षांचा कालावधी आणि दोन महिन्यानंतर नवे शैक्षणिक वर्षे सुरु होण्याचा कालावधीत हा कोविड-19 च्या चक्रात अडकल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गैरसोय झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने शासनही यात अत्यंत सावधन भुमिका घेत असून नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकल्याव्यात अशी होणारी मागणी रास्त असल्याची भुमिका पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. पालक म्हणून जे काळजीचे वातावरण आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

वृक्ष लागवडीतुन आरटीओ कार्यालय परिसराचा कायापालट करु- शैलेश कामत

नांदेड : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  रिकाम्या परिसरात असलेल्या जागेवर जी वृक्ष लागवड केली आहे त्याची काळजीपुर्वक निगा राखून सर्वांच्या प्रयत्नातून या परिसराचा कायापालट केला जाईल, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. राज्य शासनाच्या ''अटल आनंदवन घनवन योजना 2020'' अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात सहाशे वृक्षांची मियावाकी (सघन वन) पध्दतीने दोन प्लॉटवर लागवड नुकतीच करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

25 ते 30 प्रजातींची 600 रोपे मियावाकी पध्दतीने लावण्यात आले

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावर्षी एकत्र येऊन श्रमदानातून प्रादेशिक परिवहन कार्यालयात वृक्षांची जोपासना केली आहे. वृक्ष लागवडीसाठी सुमारे 25 ते 30 प्रजातींची 600 रोपे मियावाकी पध्दतीने लावण्यात आले. रोपांच्या लागवडीसाठी परिसराची साफसफाई, वृक्ष लागवड व जोपासना या संपूर्ण प्रक्रियेत या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. दैनंदिन कार्यालयीन कर्तव्य सांभाळून श्रमदानाद्वारे त्यांनी यावर्षीचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी केला आहे.

या अधिकाऱ्यांची होती उपस्थिती

इच्छाशक्ती असेल तर प्रयत्नातून कार्यालयाचा परिसर हिरवागार करता येऊ शकतो हे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कृतीतून दाखवले आहे. कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी नियमित आपल्या कामाचा काही वेळ लागवड केलेल्या वृक्षांची निगा राखण्यासाठी देतात. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहूल जाधव, रोहीत काटकर व अनंत भोसले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com