पीककर्ज पाहिजे तर मग दलालास भेटा

what_causes_the_indian_rupee_article_post_thumb.jpg
what_causes_the_indian_rupee_article_post_thumb.jpg

भोकर, (जि. नांदेड) ः जगण्याचं दुसरं काही साधन नाही म्हणून ऊन-वारा, पाऊस-गारा अंगावर झेलीत वादळी वाऱ्यात शेतात राबतो. तेव्हा कुठं चार घास सुखाचे मिळतात. निसर्ग आता लहरी बनल्याने खरीप व रब्बी हंगामातील उत्पन्न घटत आहे. सरकार मायबाप पीककर्ज देऊन दिलासा देत आहे. येथील बॅँकेत मात्र वेगळीच तऱ्हा पाहावयास मिळत आहे. पीककर्ज हवं तर मग अधिकाऱ्यांना नाही, ठेवणीतल्या दलालास भेटताच फाइल मंजूर केली जात आहे. या प्रकाराने सामान्य शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. 

भोकर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती आहे. परिणामी त्यांना निसर्गाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागते. बागायती क्षेत्र अत्यल्प प्रमाणात असून सुधाप्रकल्प सोडला तर एकही मोठा जलाशय साठा नाही. नव्याने पिंपळढव परिसरात प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे, तर इतर ठिकाणी छोटे-मोठे तलाव उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.


सामान्य शेतकरी मात्र मेटाकुटीला 
दुसरीकडे निसर्ग पूर्वीसारखा राहिला नाही. आता त्याचे रूप बदलते आहे. निसर्ग लहरी बनल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. वार्षिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. अशा संकटाच्या मालिकेत शेतकरी भरडला जातोय. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीककर्ज वाटप सुरू केले आहे. सध्या घेतलेले कर्ज माफ झाल्याने शेतकरी नवीन कर्ज घेण्यासाठी बॅंकेत तोबा गर्दी करीत आहेत. या संधीचा फायदा घेऊन अधिकारी व ठेवणीतल्या दलालांचे चांगभले होत आहे. सामान्य शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे. 


दलालाचं चांगभल 
तालुक्यातील बहुतांश शेतकरी कर्ज माफ झाल्याने नवीन कर्ज घेण्यासाठी शहरातील सर्व बॅंकेत चकरा मारत आहेत. अधिकारी मात्र कागदाची पूर्तता करा, अमुक आणा, तमुक आणा म्हणून वेळ मारून नेत आहेत. अशा निराश झालेल्या शेतकऱ्यांना बॅंकेच्या प्रांगणात बसलेले दलाल हेरून मी तुम्हाला ताबडतोब कर्ज मिळून देतो. यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील असे सांगून काम मार्गी लावत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. दलाल आणि अधिकाऱ्यांत आर्थिक व्यवहार होत असल्याने त्यांच चांगभलं होत आहे. सामान्य शेतकरी मात्र काम होत नसल्याने मेटाकुटीला आला आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com