esakal | गावाच्या विकासात सरपंच व ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका- मिना रायतळे

बोलून बातमी शोधा

file photo}

ग्राम विकास आराखड्यावर दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न..

गावाच्या विकासात सरपंच व ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका- मिना रायतळे
sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : त्रीस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायत ही पहिली व महत्त्वाची पायरी आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच व ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका आहे. गावाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आराखडा तयार करून मिळणा-या निधीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी पंचायत समिती सहकार्य करेल असे प्रतिपादन अर्धापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मिना रायतळे यांनी दोन दिवस कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी केले. यावेळी बबन बारसे यांचा सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी 14 व 15 व्या वित्त आयोगाचा सुमारे सहा कोटी विस लाखांचा निधी मिळणार आहे. या निधीतून करण्यात येणा-या विकास कामांचे नियोजन करण्यासाठी दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे, संगितता आटकोरे, पंचायत समितीच्या सभापती कांताबाई सावंत, उपसभापती अशोक कपाटे, माजी सभापती मंगल स्वामी, माजी उपसभापती सुनील आटकोरे, अशोक सावंत आदी उपस्थित होते. पंचायत समितीच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

या दोन दिवशीय कार्यशाळेला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत यशदाचे तज्ज्ञ प्रशिक्षक प्रा आमरसिंह आईलवार, महेन्द्र पंडित, बालाजी गायकवाड यांनी विविध विकास योजना, शासनाने काढलेले आदेश, परिपत्रक, निधीतून करण्यात येणारी कामे याविषयी सविस्तर माहिती दिली. या योजतेतून मानवी निर्देशांकवाढविण्यासाठी विकास कामे घेण्यावर भर देण्यासाठी माहिती देण्यात आली.

तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी गेल्या वर्षचा व 2021- 2022 या आर्थिक वर्षाचा मिळून सुमारे सहा कोटी विस लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे.यात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी, रोजगार निर्मिती आदी कामे करण्या संबंधी चर्चा करून आराखडे तयार करण्यात येणार आहेत. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी व्ही. एम. मुंडकर, एस. पी. गोखले, जी. एस. पंडलवार, विजय निकम, सतिश जकाते यांनी पुढाकार घेतला.

संपादन- प्रल्हाद कांबळे