'एक पत्र मराठा आरक्षण'साठी या अभियानास अर्धापूर तालुक्यात प्रतिसाद

'एक पत्र मराठा आरक्षण'साठी या अभियानास अर्धापूर तालुक्यात प्रतिसाद
Summary

या मोहीमेला अर्धापूर तालुक्यात खुप मोठा प्रतिसाद मिळाला असून पंतप्रधान मोदींना पत्र पाठविण्यात येत आहेत.

अर्धापूर (नांदेड) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी दहा जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी' ही मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेला अर्धापूर तालुक्यात खुप मोठा प्रतिसाद मिळाला असून पंतप्रधान मोदींना पत्र पाठविण्यात येत आहेत. (in ardhapur taluka, a campaign 'a letter for the bright future of maratha youth' was implemented)

'एक पत्र मराठा आरक्षण'साठी या अभियानास अर्धापूर तालुक्यात प्रतिसाद
हिंगोलीत तीन सेंटरवर 450 जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधित लस

 'मराठा समाजाला' आरक्षण मिळावे म्हणून नरेंद्र मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभरातून एक कोटी पत्र पाठविण्यात येणार आहेत याची घोषणा युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी केली. 

'एक पत्र मराठा आरक्षण'साठी या अभियानास अर्धापूर तालुक्यात प्रतिसाद
अर्धापूर शहरात कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाच्या अनुषंगाने

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान सन्मानीय नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अर्धापूरच्या वतीने पत्र पाठवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील टेकाळे, माजी तालुकाध्यक्ष शशी पाटील क्षिरसागर, माजी तालुकाध्यक्ष उध्दवराव राजेगोरे, माजी शहराध्यक्ष शेख साबेर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील कपाटे, सय्यद शेहबाज, विनायक दवे, नागोराव वानखेडे, आकाश कपाटे, रियाज फारुकि, दत्ता नवले, जमील चौधरी, शेख इमरान, बशीर सय्यद, राजेश कपाटे, वैजनाथ धुमाळ आदि उपस्थित होते.(in ardhapur taluka, a campaign 'a letter for the bright future of maratha youth' was implemented)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com