esakal | नांदेडात ऑनलाइन एकाला 50 हजाराचा गंडा

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज

नांदेडात ऑनलाइन एकाला 50 हजाराचा गंडा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या इतवारा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एका नामांकीत कंपनीच्या फायनान्सचे २५ लाख कर्ज मंजुर झाले अशून त्यापोटी विमा म्हणून ५० लाख रुपये भरण्याचे सांगितले. पैसे भरुनही कर्ज मिळाले नसल्याने आपली फसवणुक झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २१) एप्रील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या साईनगर भागात राहणाऱ्या अब्दुल मोबीन या फळविक्रेत्या व्यापाऱ्यास एका फायनान्सचे २५ लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगून त्याच्याकडून ऑनलाईन ५० घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला. अब्दुल मोबीन अब्दुल मजीद (वय ३१) या फळ विक्रेत्यास अज्ञात व्यक्तीने फोनवरुन आपणास एका नामांकीत कंपनीच्या फायनान्सच्या नावाचे २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. असा फोन ता. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी आला होता. त्याकरिता तुम्हाला पन्नास हजार रुपये इन्शुरन्स रक्कम भरावी लागेल असे कळविल्याने.

हेही वाचा - उच्च न्यायालयांमध्ये सुरु असलेल्या कोरोनाशी संबंधित प्रकरणांची माहिती घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस पाठवली आहे.

पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेच्या खात्यात वेगवेगळ्या तारखेला तीन टप्प्यांत मुबीन याने पन्नास हजार रुपये लोन मिळण्यासाठी भरले. परंतु लोन मंजूर न करता अब्दुल मोबीन याचा विश्वासघात करुन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अब्दुल मोबीन याने इतवारा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार श्री. काळे करीत आहेत.