esakal | नांदेडात पूरक पोषण आहारात तेलाऐवजी मिळतेय साखर
sakal

बोलून बातमी शोधा

पुरक पोषण आहार

नांदेडात पूरक पोषण आहारात तेलाऐवजी मिळतेय साखर

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : जिल्ह्यातील कुपोषण टाळण्यासह स्तनदा व गरोदर मातांना सकस आहार मिळावा यासाठी शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत पुरक पोषण आहार दिला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे या आहारात खाद्यतेलाऐवजी साखर दिली जात असल्याने, लाभार्थ्यांच्या आहारात बदल झाल्याचे बघायला मिळत आहे.

एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील तीन ते सहा वर्ष, सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील कुपोषित बालकांना आणि गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्य सदृढ रहावे, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून पूरक पोषण आहार शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत दिला जातो. यापूर्वी बालकांना गरम व ताजा आहार दिला जात होता. मात्र आता कोरोनामुळे लाभार्थ्यांना धान्य दिले जात आहे. मात्र या आहारामध्ये खाद्य तेल बंद करण्यात आल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे.

हेही वाचा - बनावट बियाणे विकणाऱ्या दोघांविरुद्ध मध्यरात्री कारवाई; गुन्हा दाखल

योजनेत काय काय मिळते

चवळी, चना, मूग, डाळ, मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळदी पावडर, तेल, मीठ, साखर आदीचे वाटप होत होते. परंतु मागील काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे खाद्य तेलाऐवजी साखर दिली जात आहे.

असे आहेत लाभार्थी

०- सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थी - १४ हजार ४७९

०- गरोदर महिला लाभार्थी - १२ हजार

०- स्तनदा माता - ५८ हजार ३३२

०- एकूण लाभार्थी - एक लाख २९ हजार

येथे क्लिक करा - दिडवर्षात महाआघाडी सरकारला मिळालेल यश भाजपच्या डोळ्यात खुपत आहे असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यानी केले आहे.

कोरोना काळातही सुरळीत वाटप

मागील मार्च महिन्यापासून शासनाच्या आदेशानुसार खाद्यतेलाऐवजी साखरेचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पोषण आहार पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील जवळपास एक लाख २९ हजार लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत पुरक पोषण आहार दिला जात आहे. कोरोना काळातही लाभार्थ्यांना पुरक पोषण आहाराचे वितरण करण्यात आले आहे.

- एस. व्ही. शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image