नांदेड :जिगरबाज महिला खेळाडूंनी गाजवली कबड्डी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nanded
नांदेड :जिगरबाज महिला खेळाडूंनी गाजवली कबड्डी स्पर्धा

नांदेड :जिगरबाज महिला खेळाडूंनी गाजवली कबड्डी स्पर्धा

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या यजमानपदी नांदेड(nanded) येथे गुजरात(gujarat), राजस्थान(rajsthan), मध्यप्रदेश(madhya pradesh) व महाराष्ट्र(maharshtra) या चार राज्यांतील पश्चिम क्षेत्रीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. ३८ विद्यापीठाच्या संघांना झालेल्या सामन्यात चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राच्या चार विद्यापीठाने पात्रता फेरी गाठून पहिल्या चार स्थानावर आपले नाव कोरले. (in nanded women players have won kabaddi competitions)

हेही वाचा: नांदेड : विश्रांतीनंतर नांदेड आगाराला सात हजाराचे उत्पन्न

नांदेड येथे झालेल्या या स्पर्धेत राजस्थान व गुजरातच्या प्रत्येकी ११, मध्येप्रदेशच्या सात, तर यजमान महाराष्ट्राच्या नऊ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला. राजस्थानच्या मोहनलाल सुखादिया विद्यापीठ उदयपूर, पंडीत दीनदयाळ विद्यापीठ शिकार, राजस्थान विद्यापीठ जयपूरच्या संघानी तर मध्यप्रदेशच्या विक्रम विद्यापीठ उज्जैन, बर्कतुल्ला विद्यापीठ भोपाळ व गुजरातच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठ वडोदरा या संघांनी स्पर्धेत दमदार कामगिरी केली.

हेही वाचा: बारडच्या युवा शेतकऱ्याने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

महाराष्ट्राच्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठ बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यजमान नांदेड विद्यापीठ या संघांनी बाद फेरीत दमदार कामगिरी केली. पण पात्रता फेरी पूर्वीच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. महाराष्ट्राच्या नागपूर, पुणे विद्यापीठांना थेट पात्रता फेरीत प्रवेश मिळाला. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबई, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व भारती विद्यापीठ पुणे या संघात सुपर लीग सामने झाले. यात नागपूर संघाने मुंबई व पुणे संघांना चांगलेच झुंजविले. पण भारती विद्यापीठ व सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघांसोबत दोन सामने गमावल्यामुळे नागपूर संघ चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. विजेते पदासाठी सावित्रीबाई फुले विरुद्ध भारती विद्यापीठ पुणे असा सामना झाला.

हेही वाचा: दोन महिन्यांत नांदेड विभागातून एकही बस धावली नाही; कारवाईला सुरुवात

लढत ठरली चर्चेचा विषय

यात सावित्रीबाई फुलेंच्या हर्षदा सोनवणेने बोनस व खोल चढया करून तर निकिता पळवडच्या दमदार पकडीने भारती विद्यापीठ कमजोर पडले. भारती विद्यापीठाच्या मंदिरा कोमकरने निकराची झुंज दिली, पण त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरेले. तिने स्पर्धेच्या अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळवून विद्यापीठाचा मान राखला. सावित्री बाई फुले विद्यापीठ पुणेने निसटत्या दोन गुणांनी विजेते पद पटकाविले तर भारती विद्यापीठ पुणे संघ उपविजेता ठरला, औरंगाबाद व नांदेड विद्यापिठाच्या उंची व शरीर यष्टीने कमी असलेल्या खेळाडूंची तगड्या संघाना तंत्रशुद्ध पद्धतीने दिलेली लढत स्पर्धेत चर्चेचा विषय बनली हे विशेष.

चमकदार कामगिरी करणाऱ्या महिला

  1. अमिता राव, उज्जवला, कोमल सिंह, ज्योती शर्मा (वडोदरा)

  2. अंजली गजयसिंह, सत्यलता (नागपूर)

  3. सोनू यादव, किरण यादव (राजस्थान)

  4. ऋतुजा होनमाने, अनुष्का फुले, दीव्या गंगवाल (मुंबई)

  5. एस. प्राची, मालती (भोपाळ)

  6. प्राजक्ता ठोंबरे, वैभवी बिरादार, सुप्रिया पाटील, कोमल ससाणे (औरंगाबाद)

  7. सानिका पवार, नेहा रेवास, सायली पाटील, अनुराधा जाधव (नांदेड)

  8. सृष्टी भाटिया, सुरभी, हितवी शाह (अहमदाबाद)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top