esakal | नांदेड जिल्ह्यात दोन महिन्यांत ६८ टक्के पाऊस, माहूरला कमी नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

rain

नांदेड जिल्ह्यात दोन महिन्यांत ६८ टक्के पाऊस, माहूरला कमी नोंद

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : जिल्ह्यात (Rain In Nanded) जूनमध्ये दमदार सुरवात केलेल्या पावसाने मध्यंतरी उघडीप दिल्याने शेतकरी धास्तावले होते. परंतु जुलैच्या दुसर्‍या पंधरवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन महिन्यातच पावसाची टक्केवारी ६८.८३ वर पोचली आहे. हा पाऊस सर्वच तालुक्यात झाला. दोन महिन्यांत पडणार्‍या पावसाच्या तुलनेत हा पाऊस दिडपट आहे. जिल्ह्यात (Nanded) सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या माहूर तालुक्यात सर्वात कमी ५९.६५ टक्के, तर सर्वाधिक पाऊस धर्माबाद (Dharmabad) तालुक्यात ९० टक्के इतका झाला आहे. मराठवाड्यात (Marathwada) नांदेड जिल्हा हमखास पावसाचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ८९१.३० मिलिमीटर पावसाची नोंद होते. यात सर्वाधिक पाऊस जंगल भाग असलेल्या माहूर (Mahur) तालुक्यात १०१६ मिलिमीटर व किनवट तालुक्यात १०२६ मिलिमीटर पडतो.

हेही वाचा: ‘अ’ ऑनलाइनचा : दूरस्थ अध्यापन पद्धती

मागील वर्षी जिल्ह्यात १०७ टक्के पर्जन्यमान झाले होते. दरम्यान यंदाही भारतीय हवामान विभागाने चांगल्या पावसाचे संकेत दिले होते. यानुसार जून महिना सुरु होताच पावसाचे आगमन झाले. परंतु जूनच्या दुसर्‍या पंधरवाड्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलैच्या दुसर्‍या पंधरवाड्यात पावसाने तुफान सुरुवात केली.या कालावधीत जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली. अतिवृष्टीमुळे पूर येऊन कोवळ्या पिकांचे नुकसानही झाले होते. तर काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली होती. दरम्यान जिल्ह्यात जून आणि जुलै या दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे पर्जन्यमान ६८.८३ टक्क्यांवर पोचले आहे. हा पाऊस सर्वच तालुक्यात झाला. दोन महिन्यांत पडणार्‍या पावसाच्या तुलनेत हा पाऊस दिडपट (१५०.४० टक्के) असल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या माहूर तालुक्यात सर्वात कमी ५९.६५ टक्के, तर सर्वाधिक पाऊस धर्माबाद तालुक्यात ९० टक्के झाला आहे. सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकरी आंतरमशागतीच्या कामांना लागले आहेत. तर नुकसान झालेले शेतकरी पिकविमा कंपनी व शासनाच्या पंचनाम्याची वाट पाहत बसले आहेत.

हेही वाचा: वैद्यकीय अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन

दोन महिन्यातील तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये, कंसात टक्केवारी)

नांदेड ३८० (६६.२९),

बिलोली ४०७ (७९.४३),

मुखेड ३३७ (७२.१५),

कंधार ३६२ (६४.३१),

लोहा ३३३ (७५.०८),

हदगाव ४६० (६०.६६),

भोकर ४३८ (६६.१३),

देगलूर ३६० (७३.८२),

किनवट ४९६ (७२.७९),

मुदखेड ४०८ (७६.७५),

हिमायतनगर ४४५ (७४.००),

माहूर ५४० (५९.६५),

धर्माबाद ३८६ (८९.९८),

उमरी ३७३ (७४.६३),

अर्धापूर ३८४ (७८.६५),

नायगाव ३०० (७८.८३)

एकूण सरासरी ४०७.८८

मिलिमीटरनुसार ६८.८३ टक्के पावसाची नोंद.

loading image
go to top