अभिनव उपक्रम : दिव्यांगांनी पोलिस प्रशासन आणि पत्रकारांचे केले स्वागत, मिठाई, तिळगुळासह दिले गुलाब पुष्प

प्रल्हाद कांबळे
Saturday, 2 January 2021

यावेळी संबंधित सर्व पोलिस निरीक्षकांनी आणि पत्रकार बांधवांनी बेरोजगार दिव्यांगांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच यापुढेही आम्ही सर्व जण आपल्या सोबत कायम असेच पाठिशी खंबीरपणे उभे आहोत आणि आपणास या नवीन वर्षात यापुढे कुठलेच आंदोलन उपोषण करण्याची वेळ येऊ नये आपल्या सर्व न्याय मागण्या याच वर्षी सर्व निकाली लागो अशा शुभेच्छा दिल्या.

नांदेड : नुतन वर्षांच्या पहिल्या दिवसाचे स्वागत करत शहर वाहतूक पोलिस, रेल्वे पोलिस, वजिराबाद पोलिस, शिवाजीनगर पोलिस यांच्यासह विविध माध्यमांचे पत्रकार यांना मिठाई व गुलाब पुष्प वाटप करुन तसेच मकरसंक्रांतीचे तिळगुळ देऊन नुतन वर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी संबंधित सर्व पोलिस निरीक्षकांनी आणि पत्रकार बांधवांनी बेरोजगार दिव्यांगांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच यापुढेही आम्ही सर्व जण आपल्या सोबत कायम असेच पाठिशी खंबीरपणे उभे आहोत आणि आपणास या नवीन वर्षात यापुढे कुठलेच आंदोलन उपोषण करण्याची वेळ येऊ नये आपल्या सर्व न्याय मागण्या याच वर्षी सर्व निकाली लागो अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी राहुल साळवे यांनी बोलताना म्हंटले आहे की, पोलिस प्रशासनाला आपला स्वतः चा परीवार बाजूला ठेवून कुठलेही सण, उत्सव- त्योहार असो नीवडणुका असो की दंगली असो यासह आमच्यासह ईतर सर्व सामाजिक संघटनांचे विविध आंदोलने उपोषणे आणि मोर्च्यां असो चोख बंदोबस्त ठेवावा लागतो. या व्यतीरीक्त मार्च २०२० पासुन ते आजवर कोरोना महामारीमुळे संसर्ग वाढु नये यासाठी अहोरात्र रस्त्यावर उतरुन जनतेची सेवा करणाऱ्या क्रांतिकारी पोलिसांवर आणि आपल्या निर्भीड लेखणीद्वारे आम्हा दिव्यांगांसह ईतर सर्व घटकांना न्याय हक्क मिळवून देणा-या पत्रकार बांधवांवर जीवघेणे हल्ले होतात हे फार निंदनीय प्रकार असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटले आहे. असे प्रकार यापुढे घडु नये यासाठी गत चार वर्षांपासून आम्ही विविध उपक्रम राबऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचा तसेच पोलिस प्रशासन आणि पत्रकार बांधवांना प्रोत्सहानांसाठी प्रयत्न करत असल्याचे श्री. साळवे यांनी सांगितले.

हेही वाचानांदेड : घ्या जाणून राष्ट्र पुरुष, जयंती आणि राष्ट्रीय दिन साजरा करण्याच्या तारखा -

या नुतन वर्षांच्या उल्लेखनीय उपक्रमात

राहुल साळवेसह चंपतराव डाकोरे, आर्यन श्रीमंगले, कार्तिक भरतीपुरम, शिवाजी सुर्यवंशी, अब्दुल माजीद शेख चांद, सय्यद माजीद, नागनाथ कामजळगे, सय्यद आरीफ, सय्यद आतिक, मुंजाजी कावळे, पांडुरंग तांदळवाड, शेख ऊमर, विठ्ठल सुर्यवंशी, राजु ईराबत्तीन, मनोहर पंडित, शेख आलीम, देवेंद्र खडसे, सय्यद हाकिम, हणमंतराव राऊत, विजय चवडेकर, गणेश मंदा, हुसेन खान, विकास साळवे, प्रशांत हणमंते, साहेबराव कदम, संजय सोनुले, गणेश वर्षेवार, सिद्धोधन गजभार, नागोरे आण्णा, रमेश लंकाढाई, भाऊसाहेब टोकलवाड, अजय गोरे, माधव बेर्जे, विश्वनाथ हंबर्डे, कमलबाई आखाडे, सविता गावते हे सहभागी झाले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Innovative Initiatives: Divyang welcomes police administration and journalists, gives roses with sweets, sesame seeds nanded news