Inspiring Story : पहिल्याच प्रयत्नात दोन भावांचे राज्य लोकसेवा परीक्षेत नेत्रदीपक यश

आई-वडिलांच्या कष्टाचे केले चीज : पशुसंवर्धन अधिकारी या पदासाठी झाली निवड
inspiring story of in first attempt 2 brothers qualify mpsc exam together marathi news
inspiring story of in first attempt 2 brothers qualify mpsc exam together marathi newsSakal

- विनोद आपटे

मुक्रमाबाद : घरची परिस्थिती जेमतेमच, कोरडा दुष्काळ तर पाचविलाच पुंजलेला. शेतीवर केलेला खर्चही निघत नव्हता, त्यात घरात चार तोंडे खाणारी. वर्षे कसे काढायचे या विचारात दिवस-रात्र जागून काढायचे अशा भयाण परिस्थितीत मुलांबाळाचे शिक्षण कसे करावे? असे अनेक प्रश्न उपस्थित असतानाही बापूराव लोंगणे या शेतकऱ्याने दिवस-रात्र काबाड कष्ट करत मुलांना उच्च शिक्षण दिले.

मुलांनीही आपल्या आई-वडीलाने केलेल्या कष्टाचे चीज करत पहिल्याच प्रयत्नात राज्य लोकसेवा स्पर्धा परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन करत आपला मुलगा अधिकारी व्हावा असे स्वप्न पाहिलेल्या आपल्या आई, वडीलांचे स्वप्न सत्यात उतरवले.

आपल्या गरीबीचे भांडवल न करता जिद्द, मेहनत आणि कठोर परिश्रमातून मिळणारे यश किती मोठे असते हे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सावरमाळ येथील लोंगणे परिवारातील ज्ञानेश्वर बापूराव लोंगणे व सुनील देविदास लोंगणे या दोन सख्या चुलत भावांनी दाखवून दिले असून इतरांसाठी ते आदर्श ठरले आहेत.

ही भांवडे अगदी लहान पणापासूनच शिक्षणात हुशार होती. बापूराव लोंगणे यांची आर्थिक परिस्थिती नसतानाही शेतात काबाड कष्ट करून नियोजन करत पैसे पुरविले. या भांवडाचे प्राथमिक शिक्षण हे, गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले.

गावात शिक्षणाच्या अधूनिक सुविधा नसल्यामुळे बापूराव लोंगणे यांनी आपल्या मुलांचे पुढील शिक्षण उदगीर येथे केले. पशुवैद्यकीय शिक्षण हे मुंबई येथे पुर्ण केले. पण एवढ्यावर समाधान न मानता आपली मुले अधिकारी होण्याचे स्वप्न आई, वडीलांनी पहिलेले होते.

मात्र, जिद्द, सातत्य आणि मेहनत यांच्या जोरावर त्यांनी कोणतेही खासगी शिकवणीचे वर्ग न लावता रात्रीचा दिवस करून अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात या स्पर्धा परीक्षेत यश खेचून आणले.

डिसेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ज्ञानेश्वर बापूराव लोंगणे व सुनील देविदास लोंगणे या सख्या चुलत भांवडांनी पहिल्याच प्रयत्नात नेत्रदिपक यश संपादन करून आपल्या गावचे नाव लौकिक केले असून शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी-एक या पदावर आपले नाव कोरले आहे.

हालाखीच्या परिस्थितीत मिळवले यश

मुलांच्यात गुणवत्ता लहानपणापासूनच असल्यामुळे ते स्पर्धा परीक्षेत यश मिळवतील असा विश्वास ज्ञानेश्वर आणि सुनील यांच्या आई-वडिलांना होता. त्यामुळे परिस्थिती नसतानाही खर्चाचे नियोजन करून त्यांच्या शिक्षणासाठी पैसा पुरवला.

आता त्यांना मिळालेल्या यशामुळे आपल्या श्रमाच चीज झाल्याची भावना लोंगणे दाम्पत्यांनी व्यक्त केली. या दोन सख्या चुलत भावंडांनी मिळवलेले यश हे निश्चितच नेत्रदीपक असून आपल्या गरीबीचे भांडवल करून मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शयुक्तच म्हणावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com