esakal | स्वारातीम विद्यापीठात कोवीडच्या आव्हानावर आंतर राष्ष्ट्रीय परिषद
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोविड-19 विषयी आंतर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जात आहे. विद्यापीठाच्या शिक्षण विभाग, 'पेफी 'अखिल भारतीय शारीरिक महासंघ नवी दिल्ली व ग्लोबल ह्यूमन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतर राष्ट्रीय परिषद.

स्वारातीम विद्यापीठात कोवीडच्या आव्हानावर आंतर राष्ष्ट्रीय परिषद

sakal_logo
By
प्रा. ईम्तीयाज खान

नांदेड : येथील स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षण व शारीरिक शिक्षण विभागातर्फे कोविड-19 विषयी आंतर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जात आहे. विद्यापीठाच्या शिक्षण विभाग, 'पेफी 'अखिल भारतीय शारीरिक महासंघ नवी दिल्ली व ग्लोबल ह्यूमन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतर राष्ट्रीय "कोविड -19 चे भावी आव्हाने "या विषयावर आंतर राष्ट्रीय दर्जाचे वक्ते आपले प्रबंध सादर करण्यात येत आहेत.

परिषदेचे उद्घाटन रविवारी (ता. १६) ऑगस्ट सकाळी साडेदहा वाजता सिनेट हॉल येथे करण्यात आले. याप्रसंगी गुजरात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अर्जुनसिंघ, पेफीचे राष्ट्रीय सचिव डॉ. पीयूष जैन, डॉ. एम. के. सिंघ. कुलगुरू त्रिपुरा विद्यापीठ. तसेच स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले. डॉ. प्रो कुलगुरू जोगेंद्रसींग बिसेन, व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. दिपक बचेवार, अधिष्ठाता डॉ. व्ही. एन. पाटील, प्रा. सी. आर,  बाविस्कर. पेफी महराष्ट्र अध्यक्ष डॉ. उदय चौहान, डॉ भीमा केंगले, कार्यकारी सचिव डॉ. सिंकू कुमार यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा  देशासाठी प्रत्येक नागरिकांनी कटिबद्ध होऊन आपले योगदान देण्याची अत्यावश्यकता-  पालकमंत्री अशोक चव्हाण

यांनी केले प्रबंध सादर

या आंतर राष्ट्रीय परिषदेत सौदी अरबचे डॉ. कोकब अझीम, डॉ. अबुसलाम, डॉ राकेश तोमर तसेच डॉ सुंदराज, डॉ यू. एम. जोती, कर्नाटका, प्रो. एम राजकुमार, कोयमतूर, डॉ जार्ज एब्राहम चेन्नई, डॉ. डी. मानियाझांगू तामिळनाडू, प्रा. रमजान मुलानी, महाराष्ट्र यांचे मानसिक व अध्यात्मिक स्वास्थ्य, उच्च शिक्षण विशेष समूह,आरोग्य, व शरीररिक परिणाम, आरोग्य शिक्षण व लिंग, शक्ती व वातावरण, गरिबी, अन्नसुरक्षा व असमानता आदी विषयावर  यांनी आपले प्रबन्ध सादर केले. 

दोन दिवशीय परिषदेचा लाभ घ्यावा- डॉ. सिंकु कुमार 

परिषदेचे संचालक व सहायक संचालक म्हणून डॉ. एस. एन. सिंघ, उत्तरप्रदेश, डॉ जाय्चरिया डॉ, एस. एकीला, डॉ. महेश जोशी, डॉ. सुनीता पाटील तामिळनाडू, डॉ. तनुजा राऊत अमरावती, डॉ. यशवंत पाटील, डॉ. प्रमोद कुमार, डॉ. गजानन प्रभुजी, डॉ उदय चौहाण, डॉ. व्ही. आर. परिहार, डॉ. विक्रम कुंटूरवार, डॉ. मीरा यादव उत्तर प्रदेश आदी काम पाहतील. या आंतर राष्ट्रीय परिषदेचा लाभ सर्वानी घ्यावा असे आहवान परिषदेचे कार्यकारी सचिव, डॉ. सिंकू कुमार यांनी केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे