अपघाताला निमंत्रणः लोखंडी खांबावरून केली जातेय नदीपार

अनिल कदम
Friday, 2 October 2020

सांगवी येथील नाल्याला पूर आल्यामुळे नाल्यावरील अर्धा पूलच वाहून गेला असून परिणामी मुख्य रस्त्यावर खुपच मोठा खड्डा पडला आहे. 
येथील ग्रामस्थांना गेल्या काही दिवसांपासून तालुक्याशी संपर्क होत नसल्यामुळे गावातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर यासह चाकरमाण्यांना तालूक्याच्या ठीकाणी ये-जा करण्यासाठी कुठलाच पर्याय नसल्यामुळे गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नाल्यानजीक असलेल्य विहीरीवरील दोन्ही लोकंडी खांब टाकून त्यावर अत्यंत धोकादायकरीत्या नाईलाजस्तव पर्यायी रस्ता बनवला गेला.
 

देगलूर, (जि. नांदेड) ः तालुक्यातील सांगवी येथील नाल्यावर असलेला पर्यायी पूल पावसात वाहून गेल्याने नागरीकांना नाला पार करण्यासाठी लोखंडी खांबाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे हा प्रवास जीवघेण्या अपघाताला आमंत्रण ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्या गावकऱ्यांचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला असून अत्यावश्यक कामासाठी नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास मात्र करत आहेत. 

 

सांगवी येथील नाल्याला पूर आल्यामुळे नाल्यावरील अर्धा पूलच वाहून गेला असून परिणामी मुख्य रस्त्यावर खुपच मोठा खड्डा पडला आहे. येथील ग्रामस्थांना गेल्या काही दिवसांपासून तालुक्याशी संपर्क होत नसल्यामुळे गावातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर यासह चाकरमाण्यांना तालूक्याच्या ठीकाणी ये-जा करण्यासाठी कुठलाच पर्याय नसल्यामुळे गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नाल्यानजीक असलेल्य विहीरीवरील दोन्ही लोकंडी खांब टाकून त्यावर अत्यंत धोकादायकरीत्या नाईलाजस्तव पर्यायी रस्ता बनवला गेला. मात्र संततधार पावसामुळे तोही पर्यायी रस्त्यासह ते दोन्ही लोखंडी खांब पूराच्या पाण्यात वाहून गेल्याने गावकऱ्यांना अनेक प्रश्नांना तोंड देण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा -  जीवनशैलीच्या बदलासह रुढी-परंपरेलाही छेद, कसा?

 

तत्काळ पर्यायी रस्ता करुन देण्याचे आदेश
गावकऱ्यांनी याबाबतची तक्रार आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करताच त्यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह पोलिस निरीक्षक भगवान धबगडे, कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी यांना घेवून पावसात गावाच्या नाल्यास भेट देवून यंत्रनेस गावऱ्यांना तत्काळ पर्यायी रस्ता करुन देण्याचे आदेश दिले. 

लक्ष देण्याची मागणी

मात्र आठ दिवसानंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थै असल्याने गावकऱ्यांना नाईलाजस्तव परत दोन लोखंडी खांबाचा पर्यायी जिवघेणा रस्ता बनवून त्या रस्त्यावरुनच ये-जा करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गावच्या समस्याबद्दल वारंवार कळवुनही ते मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गावकरी आंदोलन करण्याच्या मनस्थितीपर्यंत आलेले आहेत. सध्या गावाला बोरगाव फाटा ते सांगवीपर्यंत जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून या नाल्यावर चांगल्या दर्जाचे पूल करणे आवश्यक आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष देण्याची मागणी गावकरी करीत आहेत. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It Is Carried Across The River On Iron Poles, Nanded News