Video - गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविणे आहे शक्य, कसे? ते वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

नैसर्गिकरित्या शेवाळ हे Toxin तयार करते. Algal Bloom म्हणजे अति शेवाळ म्हणजे अति Toxin. या Toxin मुळे पाण्यातील सजीव जसे मासे, झिंगे मोठ्या प्रमाणात मरण पावतात. 

Video - गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविणे आहे शक्य, कसे? ते वाचाच

नांदेड : गोदावरी नदीचे प्रदूषण अति प्रमाणात वाढले आहे, प्रदूषणामुळे प्रामुख्याने शेवाळाची(Algae) वाढ होत आहे. सांडपाणी गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात मिसळत असल्यामुळे शेवाळ निर्माण होत आहे. परिणामी जलचर प्राण्यांसह मानवाचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

गोदावरीच्या पात्रामध्ये शहरातील १८ नाल्यांचे सांडपाणी मिसळत असल्याने प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे. कारण, सांडपाण्यात प्रामुख्याने वेगवेगळे रासायनिक घटक असतात. जसे कार्बोनेट, नायट्रेटस, फॉस्फेटस यापैकी नायट्रेटस, फॉस्फेटस हे शेवाळ वाढीसाठी पूरक nutrients आहेत. जितके जास्त नायट्रेटस, फॉस्फेटस तितकेच जास्त शेवाळ वाढण्यास मदत होते. नदीच्या तळाशी असलेल्या nutrients चा वापर करून शेवाळ  ‘photosynthesis’साठी हळूहळू पाण्याचा वरच्या स्तरावर पसरतात. 

हेही वाचा - Breaking News : नांदेडात माजी महापौरांसह नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह
 

टॉक्सिनमुळेच मरण पावतात मासे
Photosynthesis द्वारे शेवाळ स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, यासाठी ते हवेतील कार्बनडायऑक्साईड, सूर्यप्रकाश व शेवळातील chlorophyl pigments चा वापर करतात. अशा अति प्रमाणात वाढलेल्या शेवाळास ‘Algal Blooms’ असे म्हणतात. या Algal Blooms च्या वाढण्याने पाण्यावर दाट हिरवळ पसरते; ती पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी होते. तसेच नैसर्गिकरित्या शेवाळ हे Toxin तयार करते. Algal Bloom म्हणजे अति शेवाळ म्हणजे अति Toxin. या Toxin मुळे पाण्यातील सजीव जसे मासे, झिंगे मोठ्या प्रमाणात मरण पावतात. 

हे देखील वाचाच असं जगता आले तर बरं होईल, कसे? ते वाचाच 
 

मानवाच्या निष्काळजीपणाचा परिणाम
या सगळ्या नैसर्गिक प्रक्रियेला ‘Eutrophication’ असे म्हणतात. या Eutrophication मुळे गोदावरी नदीतील लाखो मासे मृत्युमुखी पडले. हे पशु व मानवासाठी सुद्धा हानीकारक आहे. हे Eutrophication मानवीय  निष्काळजीपणाचा परिणाम आहे. हे प्रदूषण समाजाने संघटित होऊन, वैज्ञानिक दृष्टया काम केल्यास Eutrophication वर मात मिळवू शकतो. त्यासाठी नांदेड जिल्ह्यात पर्यावरण प्रेमी लोकांनी ‘गोदावरी नदी संसद’ उपक्रम सुरू केला आहे. सध्या संसर्गाचा धोका संभवता फेसबुकवर गोदावरी नदी संसद ग्रुप तयार केला आहे.

येथे क्लिक कराच - कोण म्हणतंय समाजातली माणूसकी आटलीय !
 

‘गोदावरी नदी संसद ग्रुप’ची स्थापना
‘गोदावरी नदी संसद ग्रुप’ या उपक्रमास जागतिक जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, यशदा पुणेचे डॉ. वडगबाळकर, डॉ आनंद पुसावळे, डॉ सुमंत पांडे, रमाकांत कुलकर्णी, प्रमोद देशमुख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी जलनायक दिपक मोरताळे, बाबूराव केंद्रे, डॉ.परमेश्वर पौळ, उदय संगरेड्डीकर हे पुढाकार घेत आहेत. 

...तर होऊ शकते नदी प्रवाहीत 
सद्यस्थितीत गोदावरीचे पात्र दुषित झाले आहे. त्यासाठी ‘गोदावरी नदी संसद ग्रुप’ची स्थापना केली असून,  नदी बाराही महिने प्रवाहित राहण्यावर भर देण्यात येणार आहे. अर्थातच नांदेडकरांचा सहभागच गोदावरी नदीचे पुनरवैभव प्राप्त करून देऊ शकतो.
- प्रा. डॉ. सुनंदा मोरताळे-मोरे (प्राध्यापक,सूक्ष्मजीव शास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालयात, नांदेड.)

loading image
go to top