असा लागला शाळा-महाविद्यालय, प्रवासी बॅग विक्रीला वर्षभरापासून ब्रेक; बॅगांवर सत्तर टक्यापर्यंत सूट देऊन बॅग विक्रीची दुकानदारांवर वेळ 

file Photo
file Photo
Updated on

नांदेड - शाळा, महाविद्यालय सुरु होण्यापूर्वीच पाठ्यापुस्तकासोबतच हमखास विक्री होणारी बॅग मागील वर्षभरापासून लॉकडाउनच्या कचाट्यात सापडली आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय आणि त्या सोबतच प्रवासाला निघण्यापूर्वी छानशी बॅग घेऊन प्रवास करणे देखील बंद असल्याने दुकानदारांना वर्षभरापासून बॅग विक्री करणे मुश्‍किल झाले आहे. 

लॉकडाउनपूर्वी शेकडो लहान मोठ्या दुकानदारांनी छोट्यापासून ते मोठ्या प्रवासी बॅगची खरेदी करुन ठेवली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरु होतील तेव्हा बॅगांच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळेल अशी दुकानदारांना अपेक्षा होती. मात्र मार्च महिण्यात कोरोना आला आणि एप्रील २०२० मध्ये लॉकडाउन लागले. जवळपास सहा महिण्यापर्यंत लॉकडाउन सुरुच होते. या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच शाळा, महाविद्यालये आणि प्रवासावर देखील बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे बॅग विक्रेत्यांनी बॅग खरेदी केलेली लाखो रुपयाची गुंतवणूक अडकून पडली आहे. 

३० हजाराची बॅग चक्क नऊ हजार रुपयाला

वर्ष उलटले तरी गुंतवलेली रक्कम वसूल न झाल्याने अनेक लहान मोठे दुकानदार मेटाकुटीला आले आहेत. बॅग विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोरोनाच्या रुपाने पाणीच फेरले गेल्याने यातून सावरण्यासाठी अनेक दुकानदारांनी बॅग विक्रीतून होणारा नफा बाजुला ठेवत ४० ते ७० टक्के सवलतीमध्ये बॅग विक्री करण्याचा निर्णय घेणे भाग पडत आहे. त्यासाठी अनेक दुकानांमध्ये अतिशय महागड्या आणि ब्रॅन्डेड कंपनींच्या ३० हजार रुपयाच्या प्रवासी बॅगांवर मोठ्या दुकानात आणि मॉलमध्ये चक्क नऊ हजार रुपयाला विक्री करावी लागत आहे. 

दुकान मालकांना प्रश्‍न बॅगांचे करायचे काय?

शाळा आणि महाविद्यालयीन बॅगांवर देखील भरघोस सवलत दिली जात आहे. तरी देखील शाळा - महाविद्यालय बंद असल्याने ग्राहक त्याकडे वळत नाही. त्यामुळे दुकांनातील बॅगांचे करायचे काय? असा मोठा प्रश्‍न दुकानदारांसमोर निर्माण झाला आहे. 

अशा आहेत स्कुल व प्रवाशी बॅगांच्या किमती ः 

- साधी स्कूल बॅग - १५० ते ३०० रुपये 
- ब्रॅण्डेड स्कूल बॅग - ३०० ते ३,००० रुपये 
- प्रवासी बॅग (साधी, छोटी) - ४५० ते ८५० रुपये 
- प्रवासी बॅग ब्रॅण्डेड कंपनी - ९०० ते ३०,००० हजार रुपये 


बॅग विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता
शाळा - महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर बॅग लागतेच परंतु प्रवासी देखील वर्षभर बॅग खरेदी करतात. त्यामुळे आम्हाला कधीच घाटा होत नाही. परंतु मागील वर्षभरापासून शाळा, महाविद्यालयासोबत सहा महिने रेल्वे आणि एसटी बस बंद होत्या. त्यामुळे प्रवासी घराबाहेर पडले नाहीत. दरम्यान काही काळासाठी रेल्वे आणि एसटी वाहतूक सुरु झाली तरी म्हणवी तशी प्रवासी बॅगांची विक्री होत नाही. त्यामुळे बॅग विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. 
- सलीम शेख ख्वाजा, बॅग विक्रेते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com