भाजप नेत्यांनी ताळतंत्र सोडले; जयंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil criticize bjp leaders politics nanded

भाजप नेत्यांनी ताळतंत्र सोडले; जयंत पाटील

नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सध्या बोलण्याचे ताळतंत्र सोडले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केली. पाटील यांनी दुपारी विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष संघटनेचा तसेच सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, जिल्हा निरीक्षक आशाताई भिसे, नांदेड निरीक्षक प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख केला आहे. त्यांना नेहमीच राष्ट्रवादी आणि या पक्षाचे नेते दिसतात. खोटे आरोप करणे आणि बेबनाव रचण्याचे काम भाजपचे नेते मंडळी करत असून त्यांनी सध्या ताळतंत्र सोडले आहे. माझ्यात आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यातही काहीच नाराजी नाही. यासंदर्भात केवळ वावड्या आहेत.

Web Title: Jayant Patil Criticize Bjp Leaders Politics Nanded Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..