नव्या प्रभागरचनेमुळे नगरसेवकांची धाकधूक वाढली

महापालिकेच्या प्रभाग रचनेवरही प्रश्नचिन्ह : भाजप सत्तेत आल्यास बदल अटळ
Nanded Waghala Municipal Corporation
Nanded Waghala Municipal Corporationsakal

नांदेड - राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली असून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी नाराज ३५ आमदारांना घेवून आसाममधील गुवाहाटी येथे तळ ठोकला आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात आले. येणाऱ्या काळात सरकार कोसळल्यास महापालिकेच्या नव्याने होत असलेल्या प्रभाग रचनेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे. प्रभाग रचनेतून एकर किंवा दोन अथवा चार नगरसेवकांचा फाॅर्म्यूला राबविला जाईल, अशी चर्चा नगरसेवकांत जोर धरत आहे.

नांदेड वाघाळा शहर महापालिकेचा १३ जून रोजी प्रारुप आराखडा प्रसिद्ध झाला आहे. गुगल मॅपद्वारे प्रभाग रचनेच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. पूर्वी २० प्रभागातून ८१ सदस्य निवडून गेले तर आॅक्टोबर २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणूकीत ३१ प्रभागातू ९२ सदस्य निवडणून जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १३ जून रोजी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध केला आहे. २४ जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावर पाच जुलै रोजी सुनावणी होवून त्याचा निकाल काढला जाणार आहे. मनपा निवडणुकीच्या प्रारुप आराखड्याची प्रक्रिया सुरु झाली तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून ३५ आमदारांचा गट एकत्रित केला आहे, ते भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यास पाठींबा देणार असल्यामुळे राजकीय उलथापालक होणार आहे. भाजपा सत्तेवर आल्यास महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर सत्ता आली तर भाजपाला पोषक असा प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार होवू शकतो. त्यासाठी सध्या जाहीर करण्यात आलेली प्रभाग रचनेत देखील बदल होण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांची धाकधुक वाढल्याचे चित्र सध्या सुरु असलेल्या वातावरणामुळे बघायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com