esakal | कंधारच्या ज्योती वंजे बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्डने सन्मानीत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ज्योती यांना अगदी लहान वयातच शैक्षणिक जीवनापासूनच सौंदर्य क्षेत्रात कमालीची आवड होती.

कंधारच्या ज्योती वंजे बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्डने सन्मानीत

sakal_logo
By
धोंडीबा बोरगावे

फुलवळ ( जिल्हा नांदेड ) : कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील येथील रहिवासी असलेल्या ज्योती राजेश वंजे यांनी पुणे येथे भारतातील सुप्रसिद्ध बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट समिर सावला पुण्यामध्ये आयोजीत मास्टर क्लास स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये त्यांना बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड सर्टिफिकेट देण्यात आले.

ज्योती यांना अगदी लहान वयातच शैक्षणिक जीवनापासूनच सौंदर्य क्षेत्रात कमालीची आवड होती. त्यामुळेच त्यांनी कंधारसारख्या सामान्य शहरातील मुलींना त्याचा फायदा व्हावा म्हणून काया ब्युटी सलून नावाने प्रशिक्षण केंद्रही सुरु केले आहे.  
     
त्याच आवडीचं रूपांतर आपल्या जिद्दीच्या जोरावर व पतीच्या सहकार्याने याच सौंदर्य क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय नेटाने व धाडसाने कार्यप्रणालीत उतरवण्यासाठी नुकतेच पुणे येथे आयोजित मेकअप क्लासमध्ये सहभागी होऊन आपल्या कार्याचा मन्याडी ठसा उमटवत बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड मिळवला असल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे 

loading image