
धर्माबाद - कल्याण-मुंबई मटका नावालाच बंद असून धर्माबाद शहरात हा व्यवसाय मोबाइलद्वारे तेजीत आहे. ‘क्लोज जेऊ देईना, ओपन झोपूही देईना’ अशी अवस्था होऊन अनेकांच्या संसाराचे वाटोळे झाले आहे. याला आळा बसावा, यासाठी अनेक वेळा मटकाकिंगला सोडून मटका पंटरांवर तात्पुरती कारवाई करण्यात आली. मात्र, कारवाई होऊन देखील हा आकड्यांचा खेळ मोबाइलद्वारे शहरात मोठ्या प्रमाणावर खेळला जात आहे.