नांदेड : कंधारमध्ये मनमानी पद्धतीने खताची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kandahar fertilizer sale Shiv Sena demand action against agriculture officer

नांदेड : कंधारमध्ये मनमानी पद्धतीने खताची विक्री

कंधार : कृषी दुकानदाराशी संगनमत करून पंचायत समितीतील कृषी अधिकारी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे दुकानदार मनमानी पद्धतीने खताची व बोगस बियाणाची विक्री करून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. शेतकरी नागवला जात आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी कृषी दुकानदारांशी हात मिळवणी करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे कंधार तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव यांनी कृषी विकास अधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगाम जवळ आला आहे. शेतकरी खत व बियाणासाठी कृषी दुकानावर गर्दी करीत आहेत. मात्र कृषी दुकानदार नामांकित खताचा तुटवडा दाखून चढ्या भावाने विक्री करत आहेत. तसेच त्यांच्या सोबत लिंकिंग खत देऊन शेतकऱ्याची मोठ्याप्रमाणात फसवणूक करत आहेत. असे असताना देखील पंचायत समितीतील कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. कृषी अधिकारी हे दुकानदाराशी आर्थिक व्यवहार करून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील कृषी दुकानधारकांना आपल्या कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना माहिती मिळवून देण्याकरिता प्रत्येक दुकानांच्या दर्शनी भागावर उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या बी-बियाणांची आणि खतांची नावे त्या त्या दुकानदाराकडे उपलब्ध असलेला माल फलकावर नमूद करण्यास बंधनकारक करावे, शेतकऱ्यांना दुकानदाराकडून मुळ देयकांची शासनाने ठरविलेल्या दराप्रमाणे पावती देणे बंधनकारक करावे, तसेच शेतकऱ्यांना कच्ची पावती देणाऱ्या विक्रेत्यावर कार्यवाही करून परवाना रद्द करावा.

कंधार शहर आणि तालुक्यात रासायनिक बी- बियाणे व खतांची मोठ्याप्रमाणात साठवणूक करणाऱ्या कृषी विक्रेत्यावर महाराष्ट्र राज्य शासनाने ठरवलेल्या नियमांची अंमलबजावणी करून त्या विक्रेत्यावर कारवाई करावी, बेकायदेशीर विनापरवाना खतांची साठवणूक करणा-या गोडाऊन धारकास व विनःपरवाना खतांची साठवणूक करणाऱ्या व्यावसायिकावर कार्यवाही करावी. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

Web Title: Kandahar Fertilizer Sale Shiv Sena Demand Action Against Agriculture Officer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top