esakal | कंधार : फुलवळ- आंबूलगा राज्य महामार्गावर अपघात, दुचाकीस्वार ठार

बोलून बातमी शोधा

file photo

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर कार ही आंबूलगावरुन कंधारकडे जात होती. त्यात एकटा चालकच असल्याचे सांगितले गेले तर दुचाकी ही कंधारवरुन मुखेडकडे जात होती आणि त्यादुचाकीस्वारही एकटाच होता. 

कंधार : फुलवळ- आंबूलगा राज्य महामार्गावर अपघात, दुचाकीस्वार ठार

sakal_logo
By
धोंडीबा बोरगावे

फुलवळ (ता. कंधार जिल्हा नांदेड) : कंधार तालुक्यातील फुलवळ मार्गे मुखेड जाणाऱ्या राज्य महामार्गावर फुलवळ ते आंबूलगा दरम्यान मंगळवारी (ता. २२) दुपारी कार आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. संदीप बालाजी येरकलवाड (वय ३०) रा. वडारगल्ली, मुखेड असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर कार ही आंबूलगावरुन कंधारकडे जात होती. त्यात एकटा चालकच असल्याचे सांगितले गेले तर दुचाकी ही कंधारवरुन मुखेडकडे जात होती आणि त्यादुचाकीस्वारही एकटाच होता. 

फुलवळ अंतर्गत असलेल्या केवळानाईक तांडा ते आंबूलगाच्या दरम्यान असलेल्या राज्य महामार्गवर वळणाच्या ठिकाणी उतरती असल्याने सदर दोन्ही वाहन हे भरधाव वेगाने असावेत त्यातच या दोघांची ही समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला हा जोराने आदळून जवळपास १०० मीटर अंतरावर जाऊन कोसळला आणि डांबरीकरणचा रस्ता असल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तो तो जागीच ठार झाला. तर कारचालक हा घटनास्थळी अन्य कोणी येण्याअगोदारच तेथून पसार झाला असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. आंबूलगा चे पोलिस पाटील फुलारी व बिट जमादार गोंटे, सय्यद हे घटनास्थळी पोहचून स्थळ पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

संपादन - प्रल्हाद कांबळे