Video- दोन किलो सोन्याच्या संशयावरुन युवकांचे अपहरण- पोलिस अधीक्षक मगर

file photo
file photo

नांदेड : अपहरण करण्यात आलेल्या युवकांच्या घरात दोन किलो सोने असल्याचा संशय असल्याने त्यांना पळवून नेल्याची कबुली पोलिस चकमकीत गंभीर जखमी झालेल्या अट्टल आरोपी विकास हटकर याने दिली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार जीवंत काडतुस जप्त केले. त्याचे दोन साथीदार अद्याप फरार असून त्यांनाही लवकरच पकडण्यात येईल. विशेष म्हणजे दोन्ही युवकांचे प्राण वाचवून स्वत: सुरक्षीत राहून पोलिसांची कारवाई अभिनंदनीय असल्याचे सांगितले. तसेच या आरोपींवर महाराष्ट्र सामुहीक गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) लावण्याचा प्रस्ताव दाखल करुन त्या दिशेने आम्ही पावले उचलली असल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोहा शहरातील दोन गुन्हेगार व विकास हटकर हे कारागृहात असतांना त्यांची एकमेकांशी ओळख झाली. त्यातून एकमेकांच्या परिसरातील माहिती त्यांनी घेतली. यावेळी लोहा येथील गुन्हेगारांनी जमुनाबाई गिरी हिच्याकडे दोन किलो सोने असल्याचे विकास हटकरला सांगितले. हे त्याने लक्षात ठेवले.     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकास हटकर याची जामिनावर सुटका झाली. यावेळी त्याने लोहा शहरात भ्रमंती वाढविली. बुधवारी (ता. पाच) आॅगस्ट रोजी पिडीत बालक हा आपल्या भावासोबत घराशेजारी असलेल्या गिरणीवर दळण घेऊन गेला होता. त्यांच्या मागवार असलेल्या विकास हटकर याने या दोघांनाही आपल्या स्कार्पिओ गाडीत बसवून नांदेडला आणले. अपहरण केलेल्या युवकाच्या मोबाईलवरुन त्याच्या आईला वीस लाखाची खंडणी मागितली. पैसे नाही दिले तर तुझ्या मुलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. यानंतर जमुनाबाई हिने लोहा पोलिस ठाण्यात जावून मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. विकास हटकर याच्याकडील स्कार्पिओ गाडी ही विक्की चव्हाण याच्या खून प्रकरणात वापरली आहे का याची फाॅरेन्सीक लॅबकडून चौकशी सुरु असल्याचे श्री. मगर यांनी सांगितले. 

लोहा येथील शुभम गीरीव त्याच्या भावाचे केले होते अपहरण

शुभम व त्याच्या भावाचे अपहरण करणारा विष्णुपूरी (ता. नांदेड) येथील अट्टल गुन्हेगार विकास हटकर हा असल्याची खात्री पोलिसांना पटली. मोबाईल सीडीआरवरुन व त्याने केलेल्या फोनवरुन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. अपहरण केलेल्या युवकाला घेऊन तो नांदेडच्या निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर भागात एका घरात दडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी गुप्त माहिती काढून निळा रस्त्यावर सापळा लावला. यावेळी त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ, पांडूरंग भारती यांच्या पथकाला बोलावून घेतले. पोलिस दिसताच विकास हटकर हा त्या दोन्ही मुलांना घेऊन सोयबाीनच्या शेतातून पळत सुटला. यावेळी पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी क्षणांचाही विलंब न लावता विकास हटकर याच्या पायावर आपल्या शासकिय पिस्तुलातून गोळी झाडली. यात तो जखमी झाला. त्याच्या तावडीतून दोन्ही बालकांचा जीव वाचविला. 

पथकाला २५ हजाराचे बक्षिस जाहीर

जखमी विकास हटकर याला विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरा त्याच्या ताब्यातून सुटका करुन घेतलेल्या मुलांना त्याच्या आईच्या स्वाधीन केले. सदर महिला ही आपल्या दोन्ही मुलांना घेऊन ती बालाजीनगर परसिरात पालामध्ये राहते. परंतु तेथील गुन्हेगारांच्या चुकीच्या माहितीवरुन तीच्या दोन्ही मुलांचे अपहरण करण्यात आले होते. परंतु पोलिसांच्या तत्परतेने त्या दोन्ही मुलांचे प्राण वाचले. या पत्रकार परिषदेमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी (ग्रामिण) बाळासाहेब देशमुख, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थइती होती. पथकाला २५ हजार रुपयाचे बक्षिस जाहीर केले असून विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडूनही त्यांना पारितोषक मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. मगर यांनी सांगितले. 

कोण आहे विकास हटकर ? 

नांदेड तालुक्यातील विष्णुपूरी येथील विकास हटकर हा सन २०१८ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाला होता. परंतु त्याचे तिथे मन लागले नसल्याने तो तेथुन नोकरी सोडुन पळून आला होता. इकडे आल्यानंतर तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही मंडळीच्या संपर्कात आला. त्याने स्वत: लहान युवकांचा वापर करत गुन्हेगारीमध्ये पाय रोवले. त्याच्यावर पुणे व नांदेड जिल्ह्यात त्याच्यावर खंडणी, लुटमार, चोरी, खूनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे श्री. मगर यांनी सांगितले. तो विष्णुपूरी, असर्जन, पश्चिम वळण रस्ता या भागात तो गंभीर गुन्हे करत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com