
Nanded
sakal
किनवट : नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण ‘खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी’ निश्चित झाल्यानंतर शहराच्या राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या घोषणेनंतर येणारी निवडणूक रंगतदार होण्याची अपेक्षा असून, शहरातील मतदारांची या वर्षीची दिवाळी राजकीय फटाक्यांनी झगमगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.