Kinwat Rain : मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर अखेर आषाढाच्या पूर्वसंध्येला किनवट तालुक्यात दमदार पाऊस पडला. पैनगंगा नदी भरून वाहू लागली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
किनवट : मृग आणि आर्द्रा नक्षत्र जवळपास कोरडे गेल्यानंतर आषाढ मासाच्या पूर्वसंध्येला तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्या पावसातच शहरालगतची पैनगंगा नदी काठोकाठ भरली आहे. तालुक्यातील दहेली मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.