स्थायी समिती सभापतिपदी किशोर स्वामी, उपमहापौरपदी अब्दुल गफार

महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता असून त्यांच्याकडेच सर्व पदे
महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता असून त्यांच्याकडेच सर्व पदे
महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता असून त्यांच्याकडेच सर्व पदे

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या गुरूवारी (ता. दोन) झालेल्या विशेष सभेत उपमहापौरपदी कॉँग्रेसचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसचे किशोर स्वामी यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थित अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता असून त्यांच्याकडेच सर्व पदे आहेत. पीठासी अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी उपमहापौर आणि सभापती यांची निवड झाली. उपमहापौरपदी कॉँग्रेसचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांची तर स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसचे किशोर स्वामी यांची निवड करण्यात आली. या दोघांचे प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे त्यांची निवड जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जाहीर केली. निवडीनंतर महापौर जयश्री पावडे, मावळते उपमहापौर मसूद खान, मावळते सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, आयुक्त डॉ. सुनील लहाने, प्रभारी नगरसचिव अजितपालसिंग संधू, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी महापौर शैलजा स्वामी यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता असून त्यांच्याकडेच सर्व पदे
अकोला । घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस

"आमचे नेते पालकमंत्री अशोक चव्हाण व इतर नेतेमंडळींनी माझी सभापतीपदी निवड केल्याबद्दल आभार आहे. लवकरच महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचीही उभारणी लवकर करणार आहे."

- किशोर स्वामी, नूतन सभापती.

"पालकमंत्री चव्हाण यांच्यासह इतर सर्व नेतेमंडळींचा मनापासून आभारी आहे. ज्येष्ठ तसेच तरूणांना सोबत घेऊन सर्वांच्या सहकार्याने आपण काम करणार आहोत."

- अब्दुल गफार, नूतन उपमहापौर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com