कोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करु नयेत- जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

प्रल्हाद कांबळे
Monday, 20 July 2020

शहर व जिल्ह्यात सर्वत्र कोरोना बाधीत रुग्ण मोठ्या संख्यने वाढत असल्याने खासगी रुग्णालये अशा बाधीतवर उपचार करत आहेत. परंतु हा उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारा नाही. त्यासाठी कोरोना बाधईत रुग्णावंर खआसगी रुग्णालयात उपचार करु नये असा जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी एक आदेश निर्गमित केला आहे. 

नांदेड : कोरोनाचा वाढता प्रादूर्भआव लक्षात घेता जिल्हा प्रशासन सर्वोतपरी त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. शहर व जिल्ह्यात सर्वत्र कोरोना बाधीत रुग्ण मोठ्या संख्यने वाढत असल्याने खासगी रुग्णालये अशा बाधीतवर उपचार करत आहेत. परंतु हा उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारा नाही. त्यासाठी कोरोना बाधईत रुग्णावंर खआसगी रुग्णालयात उपचार करु नये असा जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी एक आदेश निर्गमित केला आहे. 

खासगी रुग्णालयातून कोविड रुग्णांना उपचार देण्यात येऊ नयेअसे इंडियन मेडिकल असोसिएशनला (इमा) नांदेड यांना पत्राद्वारे कळविले आहे. आता खासगी रुग्णालयांना संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचार करण्याची परवानगी देण्यात आली नाही. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी निमाचे अध्यक्ष यांना एक पत्र पाठविले आहे. ज्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन भरपूर उपाययोजना करीत आहे.

कोवीड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णावर उपचाराचा खर्च केल्या जात आहे.

या उपाययोजनाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील  कोणत्याही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना भरती करु नये. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यात प्रत्येक कोवीड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णावर उपचाराचा खर्च केल्या जात आहे. याबाबत जिल्हास्तरावर आपल्या माध्यमातून सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णावर उपचार करु नयेत अशा सूचना देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा असे आपल्या आदेशात म्हंटले आहे.

हेही वाचा -  लेंडी प्रकल्पाचे खरे जनक देवेंद्र फडणवीस- कोण म्हणाले वाचा...?

नांदेड जिल्ह्यातील पाऊस

नांदेड : सोमवारी (ता. २०) जुलै रोजी सकाळी आठवाजेपर्यंत जिल्ह्यातील महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात चांगला पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यात कंधार तालुक्यातील कुरुळा महसुल मंडळात ८० मिलीमीटर अर्थात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 
किनवट तालूक्यातील मांडवी इथेही जोरदास पाऊस झाला असून तिथ ६४ मिलीमीटर म्हणजे अतिवृष्टीच्या काठावर नोंद झाली आहे. शहापूर ४३, शिवणी ३५, जांब ३५, माळेगाव ३२, येवती ३०, देगलूर २८, किनी २८, सगरोळी २८, तामसा २४, मिरखेल २१, मातुळ २० यापुढील १२ महसुली मंडळात १० ते २० मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. ते या प्रमाणे जाहूर १८, खानापूर १८, माळाकोळी १६, आदमपूर १६, उस्माननगर १५, मुखेड १२, हदगाव १२, निवघा १२, आष्टी १२, लोहा ११, हानेगाव ११, मनाठा १० मिलीमीटर ईतका पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात एकुण २५ महसुली मंडळात पाऊस झाला आहे. तर अन्य ६५ मंडळात पाऊसाची गैरहजेरी जानवली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid patients should not be treated in private hospitals Collector Dr. Vipin nanded news