
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे उपस्थित होते. कोविड लसीकरण घेतलेले राज्यात सर्वात जास्त वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून भाई धोंडगे यांनी ऐतिहासिक नोंद झाली आहे.
भाई धोंडगे यांनी घेतली कोविड लस; राज्यातील सर्वात ज्येष्ठ लोकप्रतिनिधी म्हणून नोंद
नांदेड ( जिल्हा नांदेड ) : संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसेनानी भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी बहादरपूर- कंधार येथे कोविड लस घेतली. त्यांच्यासोबत श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे उपस्थित होते. कोविड लसीकरण घेतलेले राज्यात सर्वात जास्त वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून भाई धोंडगे यांनी ऐतिहासिक नोंद झाली आहे.
राज्याच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ विधिमंडळ सदस्य राहिलेले नेते भाई केशवराव धोंडगे आहेत. त्यांच्या वयाची १०२ वर्ष झाले आहेत. १९५७ पासून ते १९९५ पर्यन्त ( १९७७ खासदार) ते विधिमंडळ सदस्य होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीती पूर्वी विधिमंडळाचे भाई धोंडगे सदस्य ( १९५७) होते आता. समकालीन मोजकेच माजी सदस्य असावेत. आपल्या कर्तृत्वाच्या- भाषा प्रभुत्व व प्रभावी शैलीने त्यांची चांद्यापासून बांद्यापर्यन्त जन सामान्यावर छाप होती. राज्याच्या ११ मुख्यमंत्र्यासोबत काम करणारे ते राज्यातील एकमेव माजी आमदार असावेत.
हेही वाचा - नांदेडमध्ये रेमडेसिव्हरचा काळा बाजार करणार्या चौघांना पोलिस कोठडी
बहादरपूर- कंधार येथील लसीकरण केंद्रावर कोविड लस घेण्यासाठी भाई केशवराव धोंडगे गेले तेव्हा तेथील उपस्थित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांनी भाई धोंडगे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यांना कोविड लस देण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत श्री "शिमोए" संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे उपस्थित होते. कोविड लसीकरण मोहिमेत राज्यात सर्वात जास्त वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून भाई धोंडगे यांची ऐतिहासिक नोंद झाली आहे.
Web Title: Kovid Vaccine Taken Bhai Dhondge Registered Most Senior Mp State Nanded News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..