CM Devendra Fadnavis : कुंटूरच्या घोंगडी व्यवसायाला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
Women Empowerment : कुंटूरच्या महिला बचत गटाने बनवलेल्या घोंगडीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा मिळाली आहे. मुंबईच्या बाजारपेठेत घोंगडीला मानाचा दर्जा मिळाल्यामुळे कुंटूरच्या महिलांच्या कार्याची अधिक दखल घेण्यात आली आहे.
नायगाव : तालुक्यातील कुंटूर येथील महिला बचतगटातर्फे मेंढीच्या केसांपासून बनवलेल्या घोंगडीच्या स्टॉलला भेट देऊन महिलांच्या कामाचे कौतुक करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.