अर्धापुर तालुक्यात महिलाराज; 28 महिला सरपंच तर 20 उपसरपंच

file photo
file photo

अर्धापूर  ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया शुक्रवारी (ता. 12) संपन्न झाली आहे. तालुक्यात तिस-या टप्प्यात 16 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदांची निवडणूक पार पडली असून मालेगाव वगळता ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या मालेगाव येथे अनिल इंगोले सरपंच झाले आहे तर मनोहर खंदारे उपसरपंच. कामठ्यात दुर्गा दासे, पार्डीत जिजाबाई कांबळे, देगावात मनिषा पिंपरणे, पांगरीत गंगासागर कदम, लोणी खुर्दमध्ये अनुसया निवृत्तीराव लोणे सरपंच झाल्या आहेत.

अर्धापूर तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया संपन्न झाली आहे. तालुक्यात 28 महिला सरपंच तर 20 उपसरपंच झाल्या आहेत. पन्नास टक्के आरक्षणपेक्षा जास्त महिला सरपंच झाल्या तर आरक्षण नसतानाही अर्ध्या अर्धापूरात उपसरपंचपद हे महिलांकडे आले आहे. गावगाडा चालविण्याची जबाबदारी पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त आली आहे. गावविकासाठी तरुणाई पुढे आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याची कसरत तरुणाईला करावी लागणार आहे.

सांगवीच्या सरपंचपदी अनिल गिरी

सांगवीच्या सरपंचपदी अनिल गिरी, तर उपसरपंचपदी कामाजी कल्याणकर यांची बिनविरोध निवड झाली. रोडगी येथे सरिता दगडू काकडे सरपंच  तर उपसरपंचपदी दत्ता काकडे यांची निवड झाली. देगावात भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांच्या गटाला बहुमत असून त्यांच्या गटाच्या मनिषा राजु पिंपरणे सरपंच तर भगवान तिडके उपसरपंच झाले. लोणी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनुसयाबाई निवृत्ती लोणे, तर उपसरपंचपदी संभाजी लोणे यांची निवड झाली. भोगावात सरपंचपदी काशीराव हाक्के तर उपसरपंचपदी सय्यद करिम यांची निवड झाली.

पार्डीमध्ये जिजाबाई चांदू कांबळे यांची सरपंचपदी

जांभरुणमध्ये शितल आकाश बहादुरे यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी मंदाकीनी मारोतराव गव्हाणे यांची निवड झाली. चेनापूर येथे भाग्यरथाबाई उत्तम महागडे तर उपसरपंचपदी दिलीप लोणे यांची निवड झाली. पार्डीमध्ये जिजाबाई चांदू कांबळे यांची सरपंचपदी तर सुमनबाई दाजीसाहेब देशमुख यांची उपसरपंचपदी निवड झाली. गणपूरमध्ये रोहीदास बंडाळे यांच्या गटाला बहुमत असून त्यांचा गटाचे संतोष खरबे सरपंच झाले तर विठ्ठल बंडाळे उपसरपंच झाले. शाहपूरमध्ये बालाजी विभुते सरपंच झाले तर कालीका भगवान पवार उपसरपंच झाले.

पांगरीमध्ये महाविकास आघाडीच्या गंगासागर सतीश कदम सरपंच

पांगरीमध्ये महाविकास आघाडीच्या गंगासागर सतीश कदम सरपंच तर दादाराव वाघमोडे सरपंच झाले. कामठ्यात रणजितसिंग कामठेकर यांच्या गटाला बहुमत असून त्यांच्या गटाच्या दुर्गा विश्वनाथ दासे सरपंच तर रणजितसिंग कामठेकर उपसरपंच झाले. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आसलेल्या मालेगावात सरपंच उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. येथे सरपंचपदी अनिल इंगोले तर उपसरपंचपदी मनोहर खंदारे यांची  निवड झाली.

शेलगाव खुर्द येथे सरपंचपदी ब्रम्हानंदाबाई राजेगोरे

या दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी नऊ मते मिळाली तर माजी उपससभापती यांना सरपंचपदासाठी चार मते पडली. तर माजी जिल्हा परिषद सदस्य नागोराव इंगोले यांचा गट तटस्थ राहिला. नांदला दिग्रसमध्ये मूक्ताबाई रामदास तिडके यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी अजय सरपाते यांची निवड झाली. तर चोरंबा येथे सरपंचपदी  गिरजाराव नरोटे यांची तर उपसरपंचपदी उमाजी जाधव यांची निवड झाली. शेलगाव खुर्द येथे सरपंचपदी ब्रम्हानंदाबाई राजेगोरे यांची तर उपसरपंचपदी धीरज घोडे यांची निवड झाली आहे अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com