नांदेड जिल्ह्यातील परप्रांतीयांना लालपरीची साथ  

File Photo
File Photo

नांदेड :  देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्याच्या विविध जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी अडकुन पडलेल्या परप्रांतीय मजुरांना घरी सोडण्यासाठी राज्याने उशिरा का होईना पुढाकार घेतला आहे. त्यामुळे परप्रांतिय मजुर तहसिलदार यांचे प्रमाणपत्र मिळवण्याकरिता तीन दिवसांपासून रांगा लावून आहेत. सरकारने घरी जाण्यासाठी विशेष रेल्वेची देखील व्यवस्था केल्याने त्यांना आता घरी जाण्याची ओढ लागली आहे. 

जिल्ह्यातील भोकर, किनवट, कंधार, धर्माबाद आणि माहूर या तालुक्यात शेकडो कर्मचारी अडकुन आहेत. या मजुरांना नांदेडपर्यंत सोडण्यासाठी एसटी महामंडळाच्या नांदेड विभागातून आठ बसेसद्वारे त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर या परप्रांतिय मजुरांना रेल्वेन त्यांच्या राज्यात निश्चित ठिकाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 
 
हेही वाचा- नांदेडला दिलासा : अबचलनगरच्या पहिल्या रुग्णाची कोरोनावर मात...
मुळगावी जाण्यासाठी मजुरांची व्यवस्था

नांदेड रेल्वे विभागातून दुपारी चारच्या दरम्यान नांदेडच्या रेल्वे स्थानकाहून रेल्वे निघणार आहे. जिल्ह्यातील एक हजार ४६० मजुरांना चार वाजता श्रमीक रेल्वेने उत्तरप्रदेश राज्यातील मजुरांना निरोप दिला जाणार, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या मजुरांची व्यवस्था मंगल कार्यालय आणि कॅम्पमध्ये केलेली होती. बुधवारी (ता.१३) त्यांच्या राज्यात मूळगावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरुन शेअर केली आहे. 

शहरासह तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम मजूर, स्वीटमार्ट, फर्निचर कामगार, पापीपुरी, विविध कारखाण्यात काम करणारे मजुर यांची संख्या अधिक प्रमाणात आहे. गेल्या दिड महिण्यापासून या मजुरांचे काम बंद आहे. हाताशी असलेले पैसे संपल्याने त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत त्यांना घरी जाण्याशिवाय पर्याय नसल्याने शासनाने त्यांना तपासणी करुन घरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  

पाच तालुक्यातून आठ बस 

महामंडळाच्या बसेसनी समांतर अंतर राखुन व काटेकोरपणे नियमांचे पालन करुन एका बसमधुन २२ प्रवाशांना नांदेडच्या रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात येणार आहे. भोकरहून दोन, माहूर एक, किनवट एक, कंधार तीन आणि धर्माबाद एक अशा आठ बसेसने जवळपास १७६ प्रवाशांना रेल्वे स्थानाकापर्यंत सोडणार आहेत. 

२२ प्रवाशांना घेऊन बसेस नांदेडला येणार
विविध तालुक्यातील अडकुन पडलेल्या मजुरांना पुढे त्यांच्या गावी जाण्यासाठी बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये एका बसमध्ये २२ प्रवाशांना घेऊन बसेस नांदेडला येणार आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुनच या बसेस मार्गस्थ होतील.   
-अविनाश कचरे (विभागीय अधिकारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com