जागर अस्मितेच्या मोहिमेचा शुभारंभ- मंगाराणी अंबुलगेकर

प्रल्हाद कांबळे
Monday, 17 August 2020

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी सतपलवार, महिला व बाल कल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्रकल्प संचालक तथा अभियान सहसंचालक व्ही. आर. पाटील आदींची उपस्थिती होती.

नांदेड : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड येथे ७४ व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून जागर अस्मितेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्रांगणात करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी सतपलवार, महिला व बाल कल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्रकल्प संचालक तथा अभियान सहसंचालक व्ही. आर. पाटील आदींची उपस्थिती होती.

हेही वाचानांदेडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन टॅंक दाखल

महिला बचत गटास रोजगार उपलब्ध होईल 

ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून किशोरवयीन मुली व सर्व साधारण महिला यांना महाराष्ट्र शासनाने अस्मिता जागर कार्यक्रम अस्मिता प्लस योजनेतून माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देत आहे, सदरील व्यवसायातून महिला बचत गटास रोजगार उपलब्ध होईल आणि महिलांच्या आरोग्यच्या समस्यावर मात करता येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. 

ता. १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम 

ता. १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम जिल्ह्यात राबवली जाणार आहे. या प्रसंगी विभाग प्रमुख, कार्यालन अधीक्षक, सहायक कार्यक्रम अधिकारी श्रीमती लव्हारे, गणेश तुंमोड, गणेश कलेटलवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक गणेश कवडेवार, जिल्हा व्यवस्थापक द्वारकादास राठोड, लेखाधिकारी सुनील कुलकर्णी,  विस्तार अधिकारी गजानन पातेवार, जिल्हा व्यवस्थापक धनंजय देशपांडे, माधव भिसे, धनंजय भिसे, तालुका  व्यवस्थापक प्रा. इरवंत सुर्यकार, स्वप्नील कचवे, श्री. राऊत, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे मिलिंद व्यवहारे, देविदास जोंधळे आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of Jagar Asmita's campaign Mangarani Ambulagekar nanded news