esakal | मराठा आरक्षणावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते बोलत नाहीत- संभाजीराजे
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी राजे

मराठा आरक्षणावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते बोलत नाहीत- संभाजीराजे

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे राजकारणासाठी नाही तर मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल याचा अभ्यास करण्यासाठी व तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी दौरा करत असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

नांदेड दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात त्यांनी मंगळवारी (ता. 25) पत्रकारांसोबत वार्तालाप केला. मराठा समाजातील तज्ज्ञ व युवकांसोबतही त्यांनी संवाद साधून मराठा आरक्षणा संबंधातील त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकले नाही. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य शासनावर बोलण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. मला गटातटाच्या राजकारणामध्ये पडायचे नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर सत्ताधारी ते विरोधी पक्षातील नेते काहीच बोलत नाहीत. ही शोकांतीका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - मजुरीवर उभा केलेला निवारा आगीने हिरावल्याने संसार उघड्यावर

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही मी सूचना केल्या होत्या. परंतु अनेक्झर ट्रांजेक्शन केले नाही. तसे झाले असेल तर आरक्षण रद्द झाले नसते असेही संभाजीराजे यांनी अशोकराव चव्हाण यांना टोला लगावला. कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, औरंगाबाद, पुणे, नाशिक चा दौरा करत मी ता. २७ व ता. २८ मे रोजी मुंबईत पोचणार आहे. तेथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. त्यानंतरच दौऱ्यातील काही गोष्टी ओपन करणार असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे