esakal | बिबट्या मृत्यूप्रकरण : दोषीविरुद्ध कारवाई थंड; वन्य प्राणी मित्रांकडून संताप

बोलून बातमी शोधा

बिबट्या
बिबट्या मृत्यूप्रकरण : दोषीविरुद्ध कारवाई थंड; वन्य प्राणी मित्रांकडून संताप
sakal_logo
By
मिलींद सर्पे

किनवट ( जिल्हा नांदेड ) : माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेल्या गावात दोन बिबट्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना अलीकडेच उघड झालेली आहे. विषबाधेने बिबट्या मृत्यू पावलेल्या काही घटना घडलेल्या आहेत. परंतु, त्या उघडकीस आलेल्या नाहीत. या घटनेची चौकशी करुन दोषीविरुद्ध कडक कार्यवाही करावी, अशी मागणी वन्य प्राणी मित्रांकडून जोर धरु लागली आहे.

वनपरिक्षेत्राधिकारी व वन कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अलीकडच्या काळात जंगलातील वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. असा आरोप करुन वन्य प्राणी मित्रांकडून या घटनाबाबत खंत व्यक्त करण्यात आली आहे. वन रक्षणासाठी लाखो रुपये खर्च करुन शासन वनकर्मचारी नियुक्त करते. परंतु, हे कर्मचारी वन तस्करांची संबंध ठेवून पैसे उकळण्यात मग्न असतात. यातच वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी त्यांचे दुर्लक्ष होते व वन्य प्राणी मृत्युमुखी पडतात. तिव्र उन्हाळ्याच्या काळात वन्यपण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पानवटे तयार केल्याचे कागदोपत्री दर्शविण्यात येते. परंतु, प्रत्यक्षात मात्र अल्प प्रमाणात पाणवठे तयार करण्यात येतात. अल्प प्रमाणात पानवटेची व्यवस्था असल्यामुळे वनांमध्ये असलेले वन्य प्राणी हे पाण्याच्या शोधात वनाच्या बाहेर येतात व ते शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या विषबाधेला बळी पडतात हे यातील एक सत्य आहे.

हेही वाचा - बुद्ध पौर्णिमा : बुद्धविचार म्हणजे अहिंसेचा- शांतीचा -

किनवट व माहूर परिसराला जंगलाने वेढले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी आहेत. विशेष म्हणजे या जंगलात वृक्षाचा राजा म्हणून संबोधल्या जाणारे सागाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच मोहफुल यासह आदि वनसंपत्तीही मोठ्या प्रमाणात आहे. याबरोबरच या भागात लाकडांची तस्करी करणारी मंडळीही या भागात मोठ्या प्रमाणात आहेत.

वनामध्ये बिबट्या, खवल्या मांजर या राष्ट्रीय वन्य प्राण्या सह काळवीट, हरिण, मोर, लांडोर, मरणागी, रानडुक्कर आदी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. वन्य प्राण्यांपैकी वन तस्करांना बिबट्यांची मोठी अडचण जाणवते. यामुळे ते शेतकऱ्यांना हाताशी धरुन बिबट्यांचा काटा काढण्याच्या नेहमी प्रयत्न प्रयत्नात असतात.

या वनक्षेत्राची पाहणी करुन या वनक्षेत्रला अभयारण्य घोषित करावे, अशी मागणी वन्यप्राणी मित्राकडून मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मात्र, दुर्दैवाने या जंगलातील बिबट्या वन्य प्राणी मनुष्याकडून मोठ्या प्रमाणात मारल्या जात आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. याला काही प्रमाणात वन अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत, हे मात्र निश्चितच.

या संदर्भाने माहिती घेण्याकरिता माहूरचे वनपरिक्षेत्राधिकारी श्री. आडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पाण्याच्या शोधात वन्य प्राणी हे जंगलाबाहेर पडत आहेत. यातच जंगलाबाहेर जंगलालगत असलेल्या शेतात शेतकरी हे आपल्या शेतात उन्हाळी ज्वारी, भुईमूग आदी रब्बी पिके घेत आहेत. या पिकांच्या रक्षणासाठी त्यांना वन्य प्राण्यांची भीती वाटते म्हणून ते वन्यप्राण्यांना विषद्वारे मारत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमी संख्या मुळे आमच्यावर ही मर्यादा आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे