नांदेड : कामठा परिसरात बिबट्याची दहशत

दोनच दिवसांत वगारीसह शेळीला केले ठार
Leopard
Leopard sakal

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु) येथे बिबट्याची (Leopard)दहशत कायम असून, सोमवारी (ता.१७) रात्री पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात शेळी(Goat)ठार झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच एका वगारीलाही बिबट्याने ठार केले होते.

Leopard
नांदेड : सात वर्षांपासून फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

रविवारी (ता.१६) कामठा शिवारातील मनोहर नारायणराव आवरदे यांच्या शेतात बिबट्याने वगारीवर हल्ला करून तिला ठार केले. तेव्हा पायाच्या ठस्यावरून बिबटा असल्याची खात्री तालुका वनविभागाचे अधिकारी एस. आर. कन्ना व मालेगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. बिराजदार यांनी केली होती. परंतु, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर बिबट्याला पकडण्याची व्यवस्था करते असे म्हणाले, पण बिबट्या पकडेपर्यंत मालेगाव व कामठा परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगून जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे आवाहन केले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखीनच भीती निर्माण झाली आहे.

Leopard
नांदेड : पुढील आठवड्यापासून 'एसटी' प्रवास सुरळीत होणार

सोमवारी रात्री पुन्हा मालेगाव येथे बिबट्याच्या हल्यात शेळी ठार झाली आहे. मालेगाव ३३kv कॅनल लगत सरदार सिंह राजु सिंह ठाकूर यांच्या आखाड्यावर बांधलेल्या चार शेळ्यापैकी एका बोकडावर हल्ला करून बिबट्याने फडशा पाडला. शेळ्यांच्या ओरडण्याने जाग आल्याने बिबट्याने तिथून पळ काढला. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त नाही केला तर आखाड्यावर नौकर, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवून आखाड्यावर कोणीही जाणार नाहीत. सद्यस्थितीत गहू, हरभरा बहरला असून या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्या शिवारात पीक भिजवणीचे काम सुरु आहे. दिवसभर लोडशेडिंग असल्यामुळे रात्री पीक भिजवणीचे काम शेतकऱ्यांना करावे लागत आहे. परिणामी बिबट्याच्या भितीने शेतात कोणीही जाण्यास तयार होत नसून, वनविभागाने सदर बिबट्याला लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com