file photo
file photo

गरिबांच्या तोंडचा घास पळविणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबीत

नांदेड : संबंध जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जगातील महासत्ता यांनीही आपले गुडघे टेकविले. कोरोनाचा सर्वधीक फटका हातावर पोट असलेल्यांना बसला. त्यांची तारांबळ होउ नये किंवा त्यांच्यावर उपासमर येऊ नये म्हणून पंतप्रधान यांनी शिधात्रिकाधारकासंह सर्वांनाच मोफत धान्य देण्याचे सुरु केले. मात्र लॉकडाउनचा गैरफायदा घेत जिल्ह्यातील काही दुकानदारांनी अनेक शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले नाही. हे तपासणीत निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी १६ धान्य दुकानांचे परवाने निलंबीत केले. एवढेच नाही तर काही जणांच्या ठेवीही जमा करुन घेतल्या. 

ोलॉकडाऊनच्या काळात गरजू लाभार्थ्यांपर्यंत धान्य पुरविण्यात अनेक स्वस्त धान्य दुकानदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असताना अनेक दुकानदारांनी गरिबांच्या धाण्यावर डल्ला मारला. शासनाकडून गरजूंना धान्य मिळावे या उद्देशाने स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा करण्यात आला. अनेक धान्य विक्रेत्यांनी नियमितपणे धान्याचे वाटप केले. परंतु काही धान्यात अपहार करणाऱ्या माहीर असलेल्या दुकानदारांनी संधीसाधुन गरिबांचे धान्य पळविले. या प्रकरणाच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, मालाची पावती न देणे, दुकानाबाहेर उपलब्ध धान्याचे फलक न लावणे, धान्य न देता शिधापत्रिकाधारकांचे अंगठे घेणे यासह अन्य कारणावरून जिल्ह्यातील १६ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

लाभार्थ्यांचे हक्काचे धान्य परस्पर पळवून त्यानंतर काळ्याबाजारात 

यापैकी काही दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कमही जप्त करण्यात आली आहे. धान्य कमी देणे, मालाची पावती न देणे, दुकानासमोर फलक न लावणे आणि धान्य न देता त्यांच्या स्वाक्षऱ्या किंवा अंगठे घेतल्या जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्यानंतर तपासमी केली. यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लाभार्थ्यांचे हक्काचे धान्य परस्पर पळवून त्यानंतर काळ्याबाजारात विक्री करण्यात येते की यापुढे असे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. पुरवठा विभागाकडे ऑनलाइन तक्रारीचा खच पडला आहे. त्यामुळे अशा स्वस्त धान्य दुकानदारांच्या विरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

परवाना निलंबीत केलेले हे आहेत दुकानदार 

श्रीनिवास सोमाजी कयापाक रा. अंबाडी (ता. किनवट), हनुमंत लिंगोजी मोरे रा. भोर (ता. नायगाव), नारायण पांडुजी कवाळे रा. धनेगाव (ता. नांदेड), केशव रोडा पवार रा. नांदगाव तांडा (ता. किनवट), आनंदराव विठ्ठलराव कवळे रा. शेलगाव (ता. उमरी), जी. के. राठोड रा. पंचली (ता. किनवट), भास्कर नागोराव तरटे रा. केरूर (ता. बिलोली), अशोक मेश्राम रा. कोठारी (ता. किनवट) आसिया बेगम मोहम्मद जावेद रा. करखेली (तालुका धर्मबाद), समाज माता सावित्रीबाई फुले सावित्री मागासवर्गीय महिला औद्योगिक विकास सहकारी संस्था अटकळी (ता. बिलोली), दिगंबर गंगाधर पाटील जुनी (ता. धर्माबाद), शेषराव मारुती शेळके रा. वाडी (ता. किनवट), धुरपताबाई जेठे बिलोली, श्री. हनुमंत रोशनगाव (ता. धर्माबाद), काशिनाथ श्रीपत जाधव कनकी तांडा (ता. किनवट), सुदर्शन गंगाराम भुरे रा. पिंपळशेंडा (ता. किनवट) आदींच्या नावाने असलेल्या दुकानांचे परवाने निलंबित करून शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com