परतीच्या पावसानंतर विजेचे तांडव

साजिद खान
Sunday, 18 October 2020


हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार परतीच्या पावसाने वाई बाजार परिसराला पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. शनिवारी (ता.१८) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास विजांचा प्रचंड कडकडाटात पुन्हा एकदा पावसाने धो-धो हजेरी लावली. माहूर तालुक्यात काल झालेल्या पावसादरम्यान वीज पडून दोन महिला जखमी झाल्या तर वाईबाजार येथील एक शेतमजूर बलाबल बचावला असून गंजी मारून ठेवलेले सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. 
 

वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार परतीच्या पावसाने वाई बाजार परिसराला पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. शनिवारी (ता.१८) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास विजांचा प्रचंड कडकडाटात पुन्हा एकदा पावसाने धो-धो हजेरी लावली. माहूर तालुक्यात काल झालेल्या पावसादरम्यान वीज पडून दोन महिला जखमी झाल्या तर वाईबाजार येथील एक शेतमजूर बलाबल बचावला असून गंजी मारून ठेवलेले सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील विविध भागात होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.

सोयाबीनचे ढिगारे उभे 
काल सायंकाळी पाचच्या सुमारास विजांचा प्रचंड कडकडाटात वाई बाजार परिसरासह माहूर तालुक्यात परतीचा पाऊस मुसळधार बरसला दरम्यान तोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये म्हणून शेतकरी गेल्या आठवाभरापासून प्रयत्नाची पराकाष्ठा करीत होते. सोयाबीन सोंगणी व काढणीच्या हंगामातच परतीचा पाऊस पडणार असल्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल धाई सुरू झाली होती. त्यामुळे ऐन वेळेवर सोयाबीन सोंगानी साठी मळणीयंत्र मिळणे कठीण झाले. या मुळे बऱ्याच शेतामध्ये कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे ढिगारे उभे आहेत.

हेही वाचा -  जालन्याचा पिस्तुलधारी युवक नांदेड पोलिसांच्या जाळ्यात -

 

रुग्णालयात उपचारसाठी दाखल 
पावसापासून रक्षणाकरिता शेतकऱ्यांनी गंजी झाकून ठेवण्याची दक्षता तर घेतली मात्र पाऊस एवढा दमदार होता की गंजी खालून पाणी शिरले व सोयाबीनचा नासोडा झाला. माहूर तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व स्थानिक आमदारांनी दिल्यानंतर तहसीलदार माहूर यांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना पत्र देऊन आदेशित केले खरे मात्र अजून तरी तालुक्यातील पीक नुकसानीचे एकही पंचनामे नोंदविले गेले नाही. 

रुग्णालयात उपचारसाठी दाखल 
दरम्यान काल झालेल्या परतीच्या पावसात विजेंचाही तांडव पाहायला मिळाला. यात वाई बाजार परिसरातील बोंडगव्हाण येथील महिला शेतकरी वैशाली मंगेश गावंडे (वय २७) व पूजा अजय गावंडे (वय २५) शेतातील झाडाखाली थांबले होते.
वादळी वारे व पाऊस सुरू असताना विजेचा कडकडाट चालू होता. त्यातच झाडा जवळ वीज पडल्याने दोघेही जखमी झाले. जखमी महिलांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही. एन.भोसले यांनी जखमींवर उपचार केले. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lightning Strikes After Return Rains, Nanded News