ऐकावे ते नवलच : आमदाराच्या विरोधात ठेकेदार व रेशन दुकानदारांनी दंड थोपटले...कुठे ते वाचा? 

file photo
file photo

नायगाव (जिल्हा नांदेड ) : नायगावचे आमदार राजेश पवार यांनी राशन दुकानदार व वाळू ठेकेदारापासून जीवाला धोका असल्याचा आरोप केला. त्यांनी महसूल व पोलीस विभागावर आरोपाची राळ उडवल्यानंतर त्यांच्या विरोधात वाळू ठेकेदार व रेशन दुकानदार आक्रमक झाले. आ. पवार हे वैयक्तिक स्वार्थासाठी खोटे आरोप करुन बदनामी करत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अन्यथा १४ आगस्टपासून नायगाव तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 

कोरोनाच्या धास्तीने सध्या सर्वसामान्य नागरिकापासून अलिप्त असलेले आ. राजेश पवार हे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चर्चेत आले आहेत. निवडून आल्यापासून मी नायगाव विधानसभा मतदारसंघात राशन घोटाळा, अवेध धंदे व अवैध रेती उत्खनन प्रकरणी कडक भुमिका घेत या प्रकरणी तक्रार दिली. या लोकांपासून माझ्या जीवितास धोका आहे. पण ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक गांभीर्याने घेत नसल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री व राज्याच्या पोलीस महासंचालकाकडे केल्यानंतर वादाला तोंड फुटले असून आ. पवार यांच्या विरोधात राशन दुकानदार व रेती ठेकेदार आक्रमक झाले आहेत. 

आ. राजेश पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत

या प्रकरणी ता. २१ जुलै रोजी राशन दुकानदार व रेती ठेकेदारांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एक तक्रार दिली असून. त्यात आ. राजेश पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. कोरोनाच्या महामारीत आम्ही कुणीही नागरिक उपाशी राहू नये यासाठी परिश्रम घेवून प्रामाणिकपणे काम करुन कार्डधारकांना राशन पुरवठा करत आहोत. यासाठी कुण्याही अधिकाऱ्यांना एकही रुपया द्यावा लागत नाही. रेती ठेकेदार रेतीची रितसर वाहतूक करण्यासाठी नियमानुसार शासनाकडे पैसे भरतात पण आ. राजेश पवार यांच्या तक्रारीमुळे प्रशासन आम्हाला रेती उचलण्यासाठी परवानगी देत नाही. त्यामुळे लाखो रुपये शासन खात्यात जमा करुन रेती ठेकेदार अर्थिक अडचणीत आले आहेत.
 
आमदारांनी षडयंत्र रचून बदनामी करण्याचा विडाच उचलला

अशा परिस्थितीत आम्ही अडचणीत असतांना आमदारांनी षडयंत्र रचून बदनामी करण्याचा विडाच उचलला असून खंडणी वसूल करण्यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला तक्रार द्यायला लावायची व आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो कि, बघा त्या कार्यकर्त्यांला काहीतरी बघा असे सांगतात. राशन दुकानदार शासन दराप्रमाणे महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचांऱ्या उपस्थित धान्याचे वाटप करत असतो त्यामुळे आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना मदत करणार नाही. आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत निवडणुकीत तुमचाच प्रचार केला आहे असे तक्रारीत नमूद केले आहे. 
मतदारांनी विकास कामे करण्यासाठी निवडून दिलेले असतांना आपण गुत्तेदाराकडून १५ टक्के घेता टक्केवारी न देता कुणी टेंडर टाकल्यास स्वतः जावून कामे आडवता रेती ठेकेदाराची तक्रार करता. आ. पवारांच्या तक्रारीमुळेच घरकुलांना देण्यात येणारी रेती बंद झाली आहे. असा आरोप तर करण्यात आलाच आहे पण त्यांनी व त्यांच्या संपतीची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. 

यांनी केली मागणी

राजेश पवार यांना राशन दुकानदार किंवा रेती ठेकेदादारकडून कुठलाच धोका नाही पण त्यांच्या खोट्या तक्रारीमुळे आमच्यावरच आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. जर आमच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास त्याला आ. राजेश पवारच जबाबदार असतील अश्या संतप्त भावना निवेदनात व्यक्त केल्या आहेत. निवेदनावर राशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षा जयश्री पवार, गंगाधर बडूरे, राजेश हंबर्डे, बापूसाहेब येताळे, भगवान हानंते, गणपत शिंदे, दिगांबर वडजे, गंगाधर बेलकर, गोविंद राहेरकर, सुमनताई धमनवाडे, शेषेराव बेलकर, संदिप सातेगावकर, संजय मोरे, बाळू जाधव राहेर यांच्यासह ३५ जनांच्या सह्या आहेत. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com