लॉकडाउन : ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे ९५० रुग्णांना... 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 4 June 2020

कोरोना पॉझिटिव्हचे नाव घेतले की अंगावर शहारे येत आहेत. त्या रुग्णांवर उपचार करणारी वैद्यकीय मंडळीही दोन हात दूर राहून उपचार करत आहेत. मात्र १०८ रुग्णवाहिकेवरील कर्मचारी कोरोनाचा मुकाबला जवळून करत आहेत.

नांदेड : कोरोना या महामारीने संबंध जगाला आपल्या कवेत घेतले आहे. जगातील महासत्ता असलेले काही देश या विषाणूपुढे हतबल झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्हचे नाव घेतले की अंगावर शहारे येत आहेत. त्या रुग्णांवर उपचार करणारी वैद्यकीय मंडळीही दोन हात दूर राहून उपचार करत आहेत. मात्र १०८ रुग्णवाहिकेवरील कर्मचारी कोरोनाचा मुकाबला जवळून करत आहेत.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाच्या १०८ रुग्णवाहिका व त्यामधील कर्मचारी सज्ज आहेत. लॉकडाउनच्या काळात जिल्हा बाहेरील व सिमेवर अडकलेल्या कोरोना बाधीत, संशयीत आणि इतर रुग्णांना जवळच्या रुग्णालयात त्यांना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करुन जवळपास ९५० रुग्णांना सेवा दिली. खऱ्या अर्थाने १०८ व त्यामधील कर्मचारी कोरोना यौद्धे ठरत आहेत. 

हेही वाचाVideo : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी गुणकारी

एक लाख २५ हजार ६७ रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा

राज्यात तत्कालीन सरकारने बीव्हीजी खासगी कंपनीला २४ मार्च २०१४ मध्ये १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी परवानगी दिली. या रुग्णवाहिकेद्वारे राज्यभरात आजपर्यंत ४८ लाखाच्या वर रुग्णांना तात्काळ सेवा दिली. यामुळे अनेकांचे प्राण वाचले. ह्यामध्ये सर्पदंश, विषबाधा, गंभीर अपघात, प्रसुती इत्यादी रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते. जिल्ह्यात ही सेवा जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पुरविण्यात येते. जिल्हाभरात ही सेवा सुरू झाली तेंव्हापासून एक लाख २५ हजार ६७ रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळाली. सर्वात फायदा ग्रामिण भागातील गरोदर महिलाना झाला. 

जेथे बोलावल्यानंतर १५ मिनीटाच्या आत रुग्णवाहिका तेथे
 
सध्याच्या परिस्थितीमध्ये  कोवीड- १९ ह्या वैश्‍वीक संसर्गजन्य आजारामध्ये जिल्ह्यातील २५ रुग्‍णवाहिकेनी आजवर अतिशय उल्लेखनीय सेवा पुरविली आहे. या रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावल्यानंतर अवधी १५ मिनीटाच्या आत ही रुग्णवाहिका तेथे पोहचते. सध्या या वाहनातील चालक, वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचारी पीपीई कीटसह सज्ज असतात. या रुग्णवाहिकद्वारे पंजाब भवन, एनआरआय यात्री निवास, आयुर्वेदीक रुग्णालय, शासकिय रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना वेळेत पोहचविण्याचे काम सुरू आहे. 

येथे क्लिक करा - फेऱ्या ४४६१, उत्पन्न ३२ लाख तरीही उदिष्ट २२ टक्केच..

महासंकटात नांदेडकरांच्या सेवेत ह्या रुग्णवाहिका सज्ज

ग्रामिण भागात आपला माणुस बाहेर जिल्ह्यातून आला तर ते त्यांना स्विकारत नाहीत. ही सध्याची परिस्थिती असताना १०८ रुग्णवहिका मात्र अशा गरजु व आपत्तीत सापडलेल्या लोकांसाठी आहोरात्र धडपत आहे. अशा या महासंकटात नांदेडकरांच्या सेवेत ह्या रुग्णवाहिका सज्ज असून त्यांचा आपत्तीत अडकलेल्या व गरोदर महिलांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन बीव्हीजी कंपनीचे जिल्हा समन्वयक डॉ. सुनिल कुलकर्णी यांनी केले आहे. 
   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown: '108' ambulance to 950 patients nanded news